नवी मुंबई विमानतळाविरोधात जनहित याचिका
By admin | Published: January 15, 2015 05:30 AM2015-01-15T05:30:33+5:302015-01-15T05:30:33+5:30
प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे़ हे विमानतळ होत असलेल्या भूखंडाचा अभ्यास न करताच
Next
मुंबई : प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे़ हे विमानतळ होत असलेल्या भूखंडाचा अभ्यास न करताच याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करावा, अशी माणगी याचिकेत करण्यात आली आहे़
एका सामाजिक संघटनेने ही याचिका केली आहे़ या भूखंडामध्ये उलवे, गाढी, डुंगी या नद्यांचे पात्र देखील येणार आहे़ तसेच यासाठी येथील तिवरांच्या झाडांचीही कत्तल ँहोणार आहे व मोठी वृक्षतोड होणार आहे़ यामुळे येथे पुराचा फटका बसू शकतो़ त्यामुळे विमानतळाचा प्रकल्पच रद्द करावा, अशी मागणी याचिकेत आहे़ यावर १९ फेब्रुवारीला सुनावणी आहे़ (प्रतिनिधी)