विमान हवेत असताना वैमानिकाला हार्ट ॲटॅक; नागपूर विमानतळावर तातडीचे लॅण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:06 AM2021-08-28T10:06:00+5:302021-08-28T10:07:22+5:30

नागपूरमार्गे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्सचे विमान बीजी-२२ चे मुख्य वैमानिक नौशाद अताउल कयूम यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सहवैमानिकाने विमानाचे नियंत्रण ताब्यात घेऊन नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत (एटीसी) संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर विमान तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली.

The pilot had a heart attack while the plane was in the air; Emergency landing pdc | विमान हवेत असताना वैमानिकाला हार्ट ॲटॅक; नागपूर विमानतळावर तातडीचे लॅण्डिंग

विमान हवेत असताना वैमानिकाला हार्ट ॲटॅक; नागपूर विमानतळावर तातडीचे लॅण्डिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मस्कत येथून ढाका येथे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्स विमानाच्या मुख्य वैमानिकाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.

नागपूरमार्गे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्सचे विमान बीजी-२२ चे मुख्य वैमानिक नौशाद अताउल कयूम यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सहवैमानिकाने विमानाचे नियंत्रण ताब्यात घेऊन नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत (एटीसी) संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर विमान तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली. नागपूर एटीसीने वेळेचे महत्त्व समजून तात्काळ आकस्मिक लॅण्डिंगची परवानगी दिली आणि सकाळी ११.२३ वाजता विमानाचे यशस्वी लॅण्डिंग करण्यात आले. यादरम्यान पूर्वीपासून धावपट्टीवर उपस्थित असलेले किंग्सवे हॉस्पिटल्सचे डॉ. मोहम्मद एहतेशामुद्दीन यांनी तातडीने ४३ वर्षीय कॅप्टन नौशाद अताउल कयूम यांना बेशुद्ध अवस्थेत विमानातून बाहेर काढले आणि प्राथमिक तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नौशाद सध्या कोमात आहेत.

विमानात १२६ प्रवासी
n बांगलादेश एअरलाईन्सचे १६० सीटर विमान बोईंग-७३८ असून, त्यामध्ये १२६ प्रवासी होते. 
n सहवैमानिकाने विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविले. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून टर्मिनलमध्ये आणण्यात आले. 
n प्रवाशांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडने केली. प्रवाशांना रात्रीपर्यंत ढाका येथे नेण्यासाठी व्यवस्था करण्यात येत होती.

Read in English

Web Title: The pilot had a heart attack while the plane was in the air; Emergency landing pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.