टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 06:23 AM2024-09-29T06:23:46+5:302024-09-29T08:26:21+5:30

सामंत यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क केला. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. 

Pilot's refusal to take off; Industry Minister uday samant went chhtrapati Sambhajinagar by car | टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...

टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शुक्रवारी नागपूर, अमरावती दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले, तेव्हा वैमानिकाने टेक ऑफ करण्यास नकार दिला. कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. याप्रकरणी लोणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.

उद्योगभरारी या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एकाच दिवशी तीन कार्यक्रम असल्याने मुंबईतील एका एअर कंपनीचे एअरक्रॉफ्ट नेमण्यात आले होते. दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास ते अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले. सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम असल्याने ५ वाजता त्यांना टेक ऑफ करायचे होते. मात्र, उद्योगमंत्री विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले. आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून, टेक ऑफ करा, अशी विनंती सामंत यांनी वैमानिकाला केली; परंतु काही नियम सांगत वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सामंत यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क केला. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. 

Web Title: Pilot's refusal to take off; Industry Minister uday samant went chhtrapati Sambhajinagar by car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.