पिंपळे सौदागरला नालेसफाई सुरू
By admin | Published: May 18, 2016 01:40 AM2016-05-18T01:40:56+5:302016-05-18T01:40:56+5:30
नालेसफाई सुरू झालेली नाही, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांतील नाल्यांची सफाई सुरू झाली
रहाटणी : पावसाळा तोंडावर आला, तरी नालेसफाई सुरू झालेली नाही, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांतील नाल्यांची सफाई सुरू झाली आहे.
‘लोकमत’ने शहरातील नाल्यांची पाहणी केली होती. त्या वेळी शहरातील नाले कचऱ्याने तुंबलेली आहे. तसेच निविदाप्रक्रिया रखडल्याने नालेसफाई सुरू न झाल्याचे वृत्तही लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली असून, परिसरातील छोटे-मोठे नालेसफाईला सुरुवात केली आहे.
शहरातील नागरिकांची निविदा प्रक्रियेत पिंपळे सौदागरच्या परिसरातील नाल्यांची सफाई सुरू झाली आहे. महानगरपालिकेचे ड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आरोग्याधिकारी विनोद बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव यांनी नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. दीपमाला सोसायटी, वसंत अॅव्हेन्यू, पर्व साक्षी, फ्लोरा रेसिडेन्सी येथील नाल्यांची सफाई सुरू झाली आहे. (वार्ताहर)
पावसाला सुरुवात होईल, त्यासाठी पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी व त्याचा येथील नागरिकांना काहीही त्रास होऊ नये म्हणून विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करून व सर्व नाल्यांची पाहणी केली. नैसर्गिक नाले, भूमिगत मलनि:सारण वाहिन्या, तसेच पावसाळी पाण्याचे गटारी तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या.