अक्षयकुमार घेणार यवतमाळमधील पिंप्री बुटी गाव दत्तक
By Admin | Published: November 5, 2016 08:00 PM2016-11-05T20:00:20+5:302016-11-05T20:06:36+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय खिलाडी अक्षयकुमारने सरकारकडे व्यक्त केला होता.
>ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 5 - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय खिलाडी अक्षयकुमारने सरकारकडे व्यक्त केला होता. यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक आत्महत्या झालेले गाव सूचविण्यास सांगितले होते. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पिंप्री बुटी गाव निश्चित केले असून प्रस्तावावर स्वाक्षरीही केली आहे. हा प्रस्ताव शनिवारी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
२६ ऑक्टोबरला अक्षय कुमार यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. यावेळी अक्षय कुमार यांनी शेतकरी आत्महत्येवर चिंता व्यक्त केली होती. यासोबतच सर्वाधिक आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा विचारही व्यक्त केला होता.
यामुळे राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गावाचे नाव सूचविण्यास सांगितले होते. जिल्हा प्रशासनाने अशा गावांच्या संदर्भात विचारविमर्श करून पिंप्री बुटी गावाचे नाव सूचविले आहे. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. यामुळे दत्तक गावासंदर्भात कामकाज करण्याच्या प्रक्रियेला गती येणार आहे.
मुख्यमंत्री, विरोधी पक्षातील दिग्गज आणि शरद पवारांची भेट
पिंप्री बुटी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांशी संवाद साधत मुक्काम केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतरही या ठिकाणी शेतकरी आत्महत्या झाली. यानंतर विरोधी पक्षातील मंडळी आणि स्वत: शरद पवार यांनी भेट घेऊन शेतकºयांच्या आणि युवकांच्या व्यथा जाणून घेतल्या. राज्यमंत्री मदन येरावार यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. आता अक्षयकुमारही पिंप्रीबुटीलला दत्तक घेणार आहेत.