स्मार्ट सिटिजमध्ये पिंपरी-चिंचवडही

By admin | Published: June 24, 2017 02:51 AM2017-06-24T02:51:46+5:302017-06-24T02:51:46+5:30

केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटिजची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर केली असून

Pimpri Chinchwad in Smart Cities | स्मार्ट सिटिजमध्ये पिंपरी-चिंचवडही

स्मार्ट सिटिजमध्ये पिंपरी-चिंचवडही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटिजची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर केली असून, त्यात महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. या यादीत देशातील ३0 शहरांचा समावेश आहे.
"स्मार्ट सिटी" अंतर्गत आता ९० शहरांचा कायापालट केला जाणार आहे. अमरावती या शहराचेही नाव केंद्राकडे पाठविले होते. मात्र अमरावतीचा त्यात समावेश झालेला नाही. ज्या अमरावतीची निवड झाली आहे, ते शहर आंध्र प्रदेशातील आहे. आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून अमरावती शहर उभारण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन होऊ न तेलंगण या नव्या राज्याची स्थापना झाल्यानंतर हैदराबाद हे शहर तेलंगणकडे गेले. त्यामुळे आंध्र प्रदेशने अमरावती येथे राजधानी उभारण्यास सुरुवात केली.
नव्या यादीत केरळची राजधानी तिरुअनंतपुरम, छत्तीसगडची नवी राजधानी नवे रायपूर, गुजरातची राजधानी गांधीनगर, हिमाचलची राजधानी सिमला, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू, बिहारची राजधानी पाटणा, जम्मू व काश्मीरमधील जम्मू व श्रीनगर ही दोन्ही शहरे, सिक्किमची राजधानी गंगटोक, मिझोरमची राजधानी ऐझवाल, पुडुच्चेरी, गुजरातमधील राजकोट व दाहोद हरयाणातील कर्नाल, मध्य प्रदेशातील सागर, बिलासपूर आणि सतना, तेलंगणातील करीमनगर, अरुणाचल प्रदेशातील पासीघाट, बिहारमधील मुझफ्फरपूर, तामिळनाडूची तिरूपूर, तिरुनेलवेल्ली, तुतीकोरीन(तुतुकोडी), तिरूचिरापल्ली ही शहरे तसेच उत्तर प्रदेशातील झाशी, अलाहाबाद, अलीगढ यांचा समावेश आहे.

Web Title: Pimpri Chinchwad in Smart Cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.