पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत समावेश

By admin | Published: June 23, 2017 01:11 PM2017-06-23T13:11:44+5:302017-06-23T13:43:21+5:30

केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटींची तिसरी यादी जाहीर केली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड या शहराला स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत स्थान मिळालं आहे.

Pimpri Chinchwad is in the third list of Smart City | पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत समावेश

पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत समावेश

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 23 - स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये एकूण 30 शहरांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातल्या केवळ पिंपरी चिंचवडचाच समावेश आहे. केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटींची तिसरी यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
या तिसऱ्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड या महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशभरातील ३० शहरांची तिसरी यादी जाहीर केली. "स्मार्ट सिटी" अंतर्गत आता देशभरातील एकूण ९० शहरांचा कायापालट होणार आहे. स्मार्ट शहरांच्या योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील यादीत ३० शहरांची निवड करण्यात आली आहे. यादीत पिंपरी – चिंचवड १८ व्या स्थानी आहे. 
विशेष म्हणजे या यादीत अमरावती शहराचं सुद्धा पहिल्या पाचमध्ये नाव आहे, पण हे अमरावती शहर महाराष्ट्रातील नसून आंध्रप्रदेशातील आहे. या शिवाय तिरुवअनंतपुरम, नवा रायपूर, राजकोट, अमरावती, पाटणा, करीमनगर, मुजफ्फपूर, पुद्दूचेरी, गांधीनगर, श्रीनगर, सागर, कर्नाल, सतना, बेंगळुरु, शिमला, त्रिपूर, पिंपरी-चिंचवड, बिलासपूर, पासिघाट, जम्मू, दाहोद, तिरुनेलवेल्ली, थूठकुडी, तिरूचिरापल्ली, झाशी, आयझॉल, अलाहाबाद, अलीगढ आणि गंगटोक आदी शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
 
 

Web Title: Pimpri Chinchwad is in the third list of Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.