समुद्री चाच्यांनी पळवलेला कौस्तुभ सुखरूप परतणार!

By admin | Published: November 20, 2014 02:38 AM2014-11-20T02:38:20+5:302014-11-20T13:22:52+5:30

समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.

Pirates will return safely! | समुद्री चाच्यांनी पळवलेला कौस्तुभ सुखरूप परतणार!

समुद्री चाच्यांनी पळवलेला कौस्तुभ सुखरूप परतणार!

Next

अतुल कुलकर्णी, मुंबई
समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.
मनाला आनंद देणारी ही घटना घडली ती परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्या खा. रक्षा खडसे, महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे. आपला तरुण मुलगा कौस्तुभ गेल्या साडेतीन महिन्यांपासून संपर्कातच नाही, त्याचा फोनही लागत नाही. त्याच्या आॅफिसला विचारले तर ते सांगतात, त्याचे अपहरण झाले आहे. आमचा म्हातारणीचा आधार गेला, अशा शब्दांत कौस्तुभच्या आईवडिलांनी मुक्ताईनगरात मंत्री खडसे आणि खा. रक्षा खडसे यांना आपले गाऱ्हाणे सांगितले. सतत रडणाऱ्या त्या आईवडिलांना पाहून ते दोघेही हेलावले. खा. रक्षा खडसे या स्थायी समिती सदस्या आहेत. सगळा तपशील घेऊन त्यांनी सुषमा स्वराज यांना गाठले. कौस्तुभ हा ‘कॉटरो अमीबोज’ नावाच्या जहाजावर नोकरीला होता व हे जहाज दक्षिण आफ्रिकेत होते. अधिक माहिती घेतली असता समजले की, त्या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता व त्यात कौस्तुभला त्यांनी पळवून अंगोला देशात नेले होते. सूत्रे हलली. यात महत्त्वाची भूमिका निभावली ती परराष्ट्र खात्याचे सहसचिव संजीव कोहली यांनी. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी होती. त्यांनी तिथल्या भारतीय दूतावासात बोलणी सुरू केली. अंगोला सरकारने चौकशी सुरू केली आणि कौस्तुभ सुखरूपपणे त्यांना सापडला. हे वृत्त स्वत: कोहली यांनी रक्षा खडसे यांना एसएमएस करून कळवले. आता पुढची सूत्र हलवण्यात आली असून, कौस्तुभ दोन -चार दिवसांतच त्याच्या मुक्ताईनगरच्या घरी परत येईल, असे खडसे यांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुषमा स्वराज आणि कोहली यांच्यामुळेच हे शक्य झाले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Pirates will return safely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.