पर्यटकांना खुणावतोय डेस्टिनेशन गोवा
By Admin | Published: June 23, 2016 04:53 AM2016-06-23T04:53:40+5:302016-06-23T04:53:40+5:30
गोव्यातील स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे, महोत्सव, काजू, किल्ले, चर्च, जीवनशैली, संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत आहे. भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने गोव्याला भेट देत आहेत.
वैभव गायकर, पनवेल
गोव्यातील स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे, महोत्सव, काजू, किल्ले, चर्च, जीवनशैली, संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत आहे. भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने गोव्याला भेट देत आहेत.
पर्यटन क्षेत्र गोव्याच्या अर्थव्यवस्थेला दिशा देत आहे. गोव्यातील एकतृतियांश लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. स्थानिकांना हॉटेल व्यवसायामुळे चांगला रोजगार प्राप्त झाला आहे. देश-परदेशांतील पाच लाख पर्यटकांना सेवा पुरवली जात आहे. काही महिन्यांत ही संख्या किमान १० टक्क्यांनी वाढून सहा लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गोव्यातील स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, पायाभूत सुविधांमुळे पर्यटक याठिकाणी आकर्षित होत आहेत.
मागील तीन वर्षापासून पर्यटनाचा अधिक विकास झाला आहे. पर्यटकांसाठी गोवा पर्यटन मंत्रालयाने व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग सेवा, हॉट एअर बलून आदी उपक्रमांना गोवा सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. विशेष म्हणजे गोव्याला सध्या डेस्टिनेशन वेडिंग, इको टुरिझम, फेस्टिवल टुरिझम, योग आणि स्वास्थ्य टुरिझम, फॅशन आणि खाद्यपदार्थ टुरिझम आदीसाठी पसंती दिली जात आहे. समुद्र किनाऱ्यांवर सर्वात जास्त पर्यटक येतात. त्या अनुषंगाने संपूर्ण किनारपट्टीवर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत ६०० सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत.
गोव्यातील सण व कार्निवल
ग्रेप इस्केप्ड : ग्रेप इस्केप्ड हा भारतातील सर्वात मोठा वाईन महोत्सव आहे. तो गोवा आणि गोव्यातील जीवनशैलीचे लघु रूप मानला जातो. चविष्ट खाद्यपदार्थ, मनोरंजन यांनी हा महोत्सव परिपूर्ण असतो.
कार्निवल - गोव्यात विविध प्रकारचे कार्निवल आयोजित केले जातात. देशभरात असे कार्निवल कुठेही पहावयास मिळत नाहीत. विविध रंग, पोशाख, नृत्य प्रकार यांचा अनुभव येथे घेता येतो.
शिगमो, गोवा नारळ व काजू महोत्सव - नारळ आणि काजू महोत्सवात गोव्याची जीवनशैली प्रतिबिंबित होते.