'त्या' नद्यांबाबत योजना आखा
By admin | Published: July 19, 2016 04:43 AM2016-07-19T04:43:51+5:302016-07-19T04:43:51+5:30
पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
मुंबई : पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत दोनदा निर्देश देऊनही राज्य सरकारने निर्णय घेणे टाळल्याने उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारविरुद्ध दुसरी अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. पश्चिम घाटातील नद्यांचे पाणी नाशिक-नगरच्या धरणांद्वारे दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि जळगावच्या धरणांत वळते करावे, अशी मागणी डॉ. संजय लाखे पाटील यांनी उच्च न्यायालयात केली. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र सोमवारी सरकारने निर्णय घेतला नसल्याचे निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयाने डॉ. पाटील यांना सरकारविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
>पश्चिम घाटातील औरंग्या, नार, पार, दमणगंगा आणि अंबिका या नद्यांमधले जादा पाणी नाशिक-नगरच्या धरणांकडे वळते करून मग जायकवाडी व जळगावमधील गिरना धरणात वळते केल्यास दुष्काळ संपेल.या नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावकडे वळते करण्याची योजना आखा. आम्ही यावर लक्ष ठेवू,’ असे म्हणत खंडपीठाने या धरणांत सध्या किती पाणी आहे, याची माहिती २ आॅगस्टपर्यंत देण्याचे निर्देश सरकारला दिले.