संघटित क्षेत्राच्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी योजना

By admin | Published: January 7, 2015 01:50 AM2015-01-07T01:50:18+5:302015-01-07T01:50:18+5:30

संघटित क्षेत्राप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यांना सरकारच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली.

Plan for newsletter vendors on the field of organized sector | संघटित क्षेत्राच्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी योजना

संघटित क्षेत्राच्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी योजना

Next

नागपूर : संघटित क्षेत्राप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यांना सरकारच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली.
नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे’ लोकार्पण ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यानंतर झालेल्या समारंभात मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
पत्रकारदिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक संविधान चौकात झालेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातील शेकडो वृत्तपत्र विक्रेते बंधू उपस्थित होते. या ऐतिहासिक शिल्प साकारण्याच्या कल्पनेचे आणि शिल्पकाराचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले.
प्रास्ताविक भाषणात खा. विजय दर्डा यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सन्मानाचा मुद्दा मांडला होता. तोच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्र विक्रेते करीत असलेल्या परिश्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्यासाठी संघटित क्षेत्राप्रमाणेच लाभ देणाऱ्या काही योजना सरकारकडून सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन समाजातील शेवटच्या घटकाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. त्याच संविधानाचे नाव असलेल्या चौकात समाजाच्या शेवटच्या घटकाचे प्रतीक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प उभारण्यात आले व तेही पत्रकारदिनाच्या दिवशी हा एक विलक्षण योगायोग आहे. यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतलेला पुढाकार हा ऐतिहासिक आणि प्रशंसनीय आहे. ‘लोकमत’ने यापुढेही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वृत्तपत्र विक्रेत्याचे समाजातील महत्त्वाचे स्थान विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या दिवशी वर्तमानपत्र येत नाही त्या दिवशी विक्रेत्याचे महत्त्व कळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात संकेतस्थळावर वर्तमानपत्र उपलब्ध होण्याची सोय आहे. पण तो नाईलाज असतो. घरी बसून वर्तमानपत्र वाचण्याची मजा काही वेगळीच असते.
प्रास्ताविक करताना खा. विजय दर्डा म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्र प्रसिद्ध करणे व ते वितरित करणे अवघड होते. अशाही काळात विक्रेत्यांनी हिंमत दाखवून घरोघरी वर्तमानपत्र पोहोचविण्याचे काम केले, ते देशभक्तीचेच प्रतीक ठरते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही बळकट करण्यासाठी वृत्तपत्राची जेवढी महत्त्वाची भूमिका आहे तेवढीच विक्रेत्यांचीही आहे. त्याला सलाम करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे दर्डा म्हणाले. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. लोकमततर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांची आणि कल्याणकारी योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री व खा. विजय दर्डा यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांचा शाल, श्रीफळ आणि शिल्पाची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात आला. शिल्पकार किरण अदाते यांचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. करण दर्डा यांनी शिल्पाची प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला शहरातील सर्व आमदार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Plan for newsletter vendors on the field of organized sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.