विमान प्रवास दुपटीने वाढला
By admin | Published: October 17, 2014 01:04 AM2014-10-17T01:04:59+5:302014-10-17T01:04:59+5:30
दिवाळीनिमित्त लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विमानप्रवास दुपटीने वाढविण्यात आला. याचा लाभ घेत अगोदरच कोटा घेऊन ठेवलेल्या एजंटनी मनमानी सुरू केली आहे. काही तासांच्या अंतरासाठी सुद्धा
एजंटची मनमानी : दिवाळीच्या सुटीमुळे सुरू आहे लूट
नागपूर : दिवाळीनिमित्त लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विमानप्रवास दुपटीने वाढविण्यात आला. याचा लाभ घेत अगोदरच कोटा घेऊन ठेवलेल्या एजंटनी मनमानी सुरू केली आहे. काही तासांच्या अंतरासाठी सुद्धा तिकिटांचे दर वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दिवस, फ्लाईटची वेळ आणि आसन व्यवस्थेनुसारही तिकिटांच्या दरात बदल करण्यात आला आहे.
गुरुवारी नागपुरात कार्यरत एका प्रवाशाने इंदोरवरून मुंबईसाठी दुपारच्या फ्लाईटची पोजिशन आॅनलाईन पाहिली असता ५ हजार रुपये भाडे दाखविण्यात आले होते. सायंकाळी त्याच फ्लाईटचे भाडे १० हजार ५०० रुपये झाले. एजंटशी संपर्क साधला असता त्याच फ्लाईटचे भाडे २२ हजार रुपये सांगण्यात आले. विमानाचे हे भाडे २६ आॅक्टोबर रोजीचे सांगण्यात आले आहे.
नागपूर ते पुणे साठी असलेल्या विमानाचे सुद्धा दर दिवशी वेगवेगळे भाडे आहेत. शुक्रवारी नागपूर ते पुणेच्या एका फ्लाईटचे भाडे ५८९० रुपये सांगण्यात आले आहे तर २३ आॅक्टोबरनंतर ७१४९ रुपये भांडे सांगितले जात आहे. ही माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील संबंधित विमान कंपण्यांच्या काऊंटरवरूनच देण्यात आलेली आहे. तर एजंटांकडे वेगवेगळे दर आहेत.
इतकेच नव्हे तर लो कॉस्ट कॅरियर (एलसीसी) या फ्लाईटच्या तिकिटांचे दर साधारणपणे कमी राहतात. त्याच्या तिकिटांच्या किमती सुद्धा एजंटनी भरमसाट वाढविल्या आहेत.
विमानांच्या तिकिटांसोबतच खासगी बसेसची सुद्धा अशीच अवस्था आहे. दिवाळीपूर्वीच खासगी बसेसच्या तिकिटांचे दर दुपटीने वाढले आहेत. दलालांनी प्रवाशांना लुटण्यासाठी आपले नेटवर्क आणखी मजबुत केले आहे. विमान, रेल्वे आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दलालांची करडी नजर आहे. (प्रतिनिधी)
कमिशनचा खेळ
तिकिटांचे दर वाढण्यामागे कमिशनचा खेळही कारणीभूत आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर एजंटाची नेमणूक करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनवर आॅटो चालक कमिशन एजंटचे काम करीत आहे. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रवाशांशी चर्चा करीत त्यांना प्रवास व थांबण्याच्या ठिकाणांची माहिती देतात. रामदासपेठ, धरमपेठ, सदर, मानस चौक, शंकरनगर, सीए रोड, गणेशपेठ बस स्टॅण्ड, छावणी, गेट नाग रोड, वर्धा रोड आदी ठिकाणी एजंट दिसून येतात. खासगी ट्रॅव्हल्ससाठी तर दलालांची संख्या अचानक वाढली आहे.