भूखंड नियमानुसारच मिळाला - हेमा मालिनी
By admin | Published: February 1, 2016 05:23 PM2016-02-01T17:23:27+5:302016-02-01T17:23:27+5:30
राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आलेला भूखंड हा नियमानुसारच मिऴाला असल्याचे प्रख्यात अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आलेला भूखंड हा नियमानुसारच मिऴाला असल्याचे प्रख्यात अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून वितरित करण्यात आलेला हा भूखंड नियमानुसारच मिळाला आहे. मी गेल्या २० वर्षांपासून हा भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. यापूर्वीचे सरकारही हा भूखंड देण्यासाठी राजी होते मात्र, प्रत्येकवेळी काही ना काही अडचणी येत गेल्या, असे यावेळी हेमा मालिनी यांनी सांगितले.
हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्र चॅरिटी ट्रस्ट या संस्थेला सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी आंबिवली, अंधेरी (मुंबई) येथील २ हजार चौरस मीटरचा भूखंड राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. यावर, हा भूखंड देताना नियमांची पायमल्ली करुन हेमा मालिनी यांना कमी दरात दिल्याच्या आरोप करण्यात आला होता.