प्लास्टिक अंडे म्हणजे अफवाच : एफडीए

By admin | Published: May 11, 2017 01:58 AM2017-05-11T01:58:01+5:302017-05-11T01:58:09+5:30

अंडे हे अंडेच असून ते प्लास्टिकचे नसल्याचे ठाणे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तसेच याबाबत

Plastic eggs are rumors: FDA | प्लास्टिक अंडे म्हणजे अफवाच : एफडीए

प्लास्टिक अंडे म्हणजे अफवाच : एफडीए

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अंडे हे अंडेच असून ते प्लास्टिकचे नसल्याचे ठाणे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तसेच याबाबत तज्ज्ञमंडळींनी प्लास्टिक अंडे ही खर्चिक बाब आहे. त्यातच, अचानक यंदा वातावरणातील बदलाचा अंड्यांवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्याचबरोबर मार्केटमधील अंडी खाण्यास योग्य असल्याची माहिती एफडीएने दिली.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत प्लास्टिकची अंडी असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यावर ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत डोंबिवली असो, वसई अथवा अंबरनाथ येथून १८ अंड्यांची नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे नमुने घेताना ज्या दुकानातून घेतली गेली, त्याने कोणत्या व्यावसायिकाकडून घेतली. तसेच ते कोणत्या पोल्ट्रीतून आले, अशा ठिकाणावरून घेण्यात आले आहे. तसेच तपासणी करताना, अंड्याच्या कवचासह पांढरा आणि पिवळा बलकही तपासण्यात आला. याचदरम्यान, प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, त्यामध्ये प्लास्टिक नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच याबाबत, तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेतल्यावर त्यांनीही वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान, प्लास्टिक अंड्याबाबत अद्यापही एकही तक्रार आलेली नाही.

Web Title: Plastic eggs are rumors: FDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.