अहमदनगरच्या राहुरीत साकारला प्लॅस्टिकचा पहिला रस्ता

By admin | Published: May 21, 2017 02:30 PM2017-05-21T14:30:06+5:302017-05-21T14:30:06+5:30

टाकाऊ प्लॅस्टिकपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पहिला प्लॅस्टिकचा रस्ता रविवारी साकारला़ प्लॅस्टिकमुक्त राहुरी विद्यापीठ करण्यासाठी कुलगुुरु

Plastic Road's first road in Ahmednagar | अहमदनगरच्या राहुरीत साकारला प्लॅस्टिकचा पहिला रस्ता

अहमदनगरच्या राहुरीत साकारला प्लॅस्टिकचा पहिला रस्ता

Next

आॅनलाईन लोकमत
राहुरी (अहमदनगर), दि. 21 - टाकाऊ प्लॅस्टिकपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पहिला प्लॅस्टिकचा रस्ता रविवारी साकारला़ प्लॅस्टिकमुक्त राहुरी विद्यापीठ करण्यासाठी कुलगुुरु डॉ़ के़ विश्वनाथा यांच्या ‘स्वच्छ व सुंदर विद्यापीठ प्रकल्पांतर्गत रविवारी हा अर्धा किलोमीटरचा रस्ता प्लॅस्टिकच्या मिश्रणातून साकारण्यात आला आहे.

विद्यापीठाचा परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लॅस्टिक गोळा केले़ हे प्लॅस्टिक १६० डिग्री तापमानावर वितळवून ते डांबरात मिसळण्यात आले आहे़ डांबरामध्ये मिसळणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण १० टक्के ठेवण्यात आले आहे़ रविवारी या प्लॅस्टिक रस्त्याचे काम केंद्रीय कृषी सचिव डॉ़ एस़ के. पटनायक व वैंगुर्ला येथील मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास कोकराचा यांच्या उपस्थितीत करण्यात आले़ विद्यापीठाचे प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत यादरम्यान अर्धा किलोमीटर लांबीचा हा प्लास्टिक रस्ता साकारला जाणार आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापिठात प्लॅस्टिकचा रस्ता बनविण्याचा हा पहिलाचा प्रयोग आहे़ कुलगुरू डॉ़ के़ विश्वनाथा यांच्या संकल्पनेतून एक वर्षापासून विद्यापीठ परिसरात प्लॅस्टिक गोळा केले जात होते़ आठवड्यातून एकदा कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लॅस्टिक गोळा करण्याचा उपक्रम राबविला़ गोळा केलेले प्लॅस्टिक कुंड्यांमध्ये साठवले़

प्लॅस्टिकमुळे गटारी तुंबल्या जातात. शिवाय जनावरेही प्लॅस्टिक खातात. त्यावर उपाय म्हणून परिसर प्लॅस्टिकमुक्त विद्यापीठा हा उपक्रम हाती घेण्यात आला़ गोळा केलेला प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यात वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग असून अन्य विद्यापीठातही वापरला जाणार आहे. आधी अर्धा किलोमीटरचा हा रस्ता प्लास्टिकचा होईल. प्लास्टिक उपलब्ध होताच विद्यापीठ परिसरातील सर्व रस्त्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल, असे कुलगुरु डॉ. विश्वनाथा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Plastic Road's first road in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.