विद्याथ्र्याच्या मानगुटावर ‘प्लँचेट’चे भूत
By admin | Published: July 23, 2014 11:42 PM2014-07-23T23:42:26+5:302014-07-23T23:42:26+5:30
इंजिनिअरिंग, मेडिकल, तसेच पदव्युत्तर उच्च शिक्षण घेणारे काही विद्यार्थी गंमत म्हणून प्लँचेट करीत असल्याची माहिती उजेडात आली आहे.
Next
दीपक जाधव - पुणो
इंजिनिअरिंग, मेडिकल, तसेच पदव्युत्तर उच्च शिक्षण घेणारे काही विद्यार्थी गंमत म्हणून प्लँचेट करीत असल्याची माहिती उजेडात आली आहे. अगदी महात्मा गांधी, हुकूमशहा हिटलर यांच्यासह अनेक कथित सुष्ट व दुष्ट आत्म्यांना बोलावून त्यांच्याकडून भविष्य जाणून घेण्याचे प्रकार विद्याथ्र्याकडून सर्रास केले जात आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लावताना पुणो पोलिसांनी प्लँचेट करून दाभोलकरांच्या आत्म्यालाच बोलावले आणि हल्लेखोर कोण आहेत, हे विचारल्याचा दावा केला जात आहे. महाविद्यालयांमध्ये शिकत असताना कुण्या मित्रच्या ऐकीव माहितीवर सुरूवातीला केवळ मजा म्हणून असे प्रकार केले जातात. मात्र, या सामूहिक अंधविश्वासाचा परिणाम ‘आत्मा’ या संकल्पनेवर त्यांचा विश्वास बसण्यामध्ये होत आहे.
अंधo्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले, की प्रश्नाचे उत्तर होकारार्थी यावे, अशी प्रबळ इच्छा आत्म्याला प्रश्न विचारणा:या व्यक्तीची असते, त्यातून नकळतपणो नखात सर्व शक्ती एकवटून तो जोर लावतो. त्यातून ती वाटी सरकते. मात्र, त्या व्यक्तीला ती आपोआप सरकली, असा भ्रम होतो.
अंगात बाबा, बुवा किंवा देवी येत असल्याचा दावा करून भोंदुगिरी करण्याचा प्रकार हादेखील प्लँचेटचाच भाग आहे. अशा अनेक बाबा, बुवांचा पर्दाफाश अंधo्रद्धा निमरूलन समितीकडून करण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
खूप असुरक्षितता, हवे ते मिळविण्याची तीव्र इच्छा यातून प्लॅँचेट, दुस:याचा आत्मा शरीरात बोलाविणो, असे प्रकार घडतात. विज्ञानवादी बौद्धिक दृष्टिकोन व भावना या दोन वेगळया गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मनावर खूप ताण आला असता, तो वैचारिक भूमिकेवरून भावनिक भूमिकेत शिरतो. ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत ती भावनेच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्यातून त्याच्या हातून अविवेकी गोष्टी घडतात.
- डॉ. वासुदेव परळीकर,
मानसोपचार तज्ज्ञ
प्लँचेटची उत्सुकता..
रात्री प्लँचेटद्वारे आत्म्याकडून उत्तर मिळविण्यासाठी महाविद्यालयीन विद्याथ्र्याकडून ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी पद्धत वापरली जाते. त्यासाठी ‘येस’ व ‘नो’ लिहून दोन गोल आखले जातात. त्याच्या मध्यभागी वाटी उपडी ठेवली जाते. सर्व जण गोलाकार बसतात. खोलीत अंधार करून मेणबत्ती पेटवली जाते. ज्याला प्रश्न विचारायचे आहेत तो त्या वाटीला नखाने निसटता स्पर्श करतो. प्लँचेटचे संयोजन करणारा आत्म्याला आवाहन करून बोलावतो. त्यानंतर त्या आत्म्याला प्रश्न विचारण्यास सांगितले जाते.
साधारणपणो परीक्षेत यश मिळेल का, लगA होईल का, असे प्रश्न विचारले जातात. त्या वेळी वाटी ‘येस’च्या बाजूने सरकली, तर त्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी समजले
जाते आणि ‘नो’च्या बाजूने सरकली तर नकार मानला जातो. अशा पद्धतीने प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच जिवंत व्यक्तींच्याही आत्म्यांना बोलाविण्याचे प्रकार केले जातात.