बेरजेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ

By admin | Published: October 2, 2014 10:55 PM2014-10-02T22:55:41+5:302014-10-02T22:55:41+5:30

सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले.

Platinum politics | बेरजेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ

बेरजेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ

Next
>नंदकुमार टेणी - ठाणो
जिथे शिवसेनेचा प्रभाव नाही परंतु, जे मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले. रुपाली निलंगेकर आणि रजनी पाटील अशी त्याची उदाहरणो आहेत. परंतु, आपला 
बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आहे. शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणात हा अत्यंत महत्वाचा असा प्रयोग आहे.
केवळ निष्ठा या एकाच निकषावर मतांचे राजकारण करता येत नाही आणि सत्ताही मिळविता येत नाही. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता हाच निकष सर्व पक्ष महत्वाचा मानतात. त्यानुसारच उमेदवारी देतात. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनीही त्यासाठीच अन्य पक्षातून ठिकठिकाणी उमेदवार ठरू शकणारे नेते आपल्या पक्षात सामावून घेतले होते. त्यात या वेळी आघाडी आणि युती नसल्याने राजकीय आव्हान खूपच बदललेले होते. राजकारणात जो स्थितीनुसार बदलातो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला. त्यामुळेच प्रताप सरनाईकांसारखा मोहरा सेनेच्या हाती लागला. भाईंदर ते ओवळा-माजीवडा येथील भगव्याचे बस्तान त्यांनी कसे मजबूत केले हे ठाण्याने पाहिले आहे.  राजन विचारे खासदार झाल्यामुळे सेनेच्या वाटय़ाचा रिकामा झालेला मतदारसंघ निष्ठावंताला 
देण्याऐवजी तो कॉंग्रेसमधून सात नगरसेवकांसह शिवसेनेत 
अगदी अलीकडे आलेल्या रवी फाटक यांना देण्याची खेळी 
त्यातूनच साकारली आहे. निष्ठा महत्वाचीच परंतु, निवडणुकीचे अर्थकारण आणि त्यासोबत इतरही पात्रता या अधिक महत्त्वाच्या हे लक्षात घेऊनच ही खेळी खेळली गेली. 
 
4बंडखोर निष्ठावंताना मातोश्रीने बोलावून समजावण्याचा आणि पुरस्कृत करण्याचा जो पवित्र घेतला तोदेखील याच भगव्या बेरजेच्या राजकारणाचा एक भाग आहे. 
4सेनेच्या या प्रयोगाची धास्ती मित्रपक्ष असलेल्या भाजपापासून सगळ्य़ांनीच घेतली आहे. हा विस्तारीत प्रयोग यशस्वी झाला तर जिल्हाप्रमुख तसेच आमदार आणि जिल्हासंपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. 
4आता निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना संधी आणि एकदा सत्ता आली की, निष्ठावंतांना त्या सत्तेत मानाचे पान अशीही खेळी यात दडलेली आहे.
 
राजकारणात जो स्थितीनुसार बदलतो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला.
 
आपला बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी ओवळा-माजीवडय़ात करून दाखवली आहे.
 
4ही निवडणूक चारही पक्ष प्रचंड ईर्षेने लढविणार आहेत. त्यामुळे त्यात तुल्यबळ ठरणारा उमेदवार देणो आवश्यक होते. त्यातूनच हे बेरजेचे राजकारण साकारले.
4एकाच वेळी निष्ठावंताना चुचकारणो, त्यांचे सहकार्य निवडणुकीसाठी मिळविणो आणि त्याच वेळी शिवसेनेचे विधानसभेतले संख्याबळ जो वाढवू  शकेल अशाला सेनेत आणून उमेदवारी देणो असे एका दगडात दोन पक्षी मारणारे हे बेरजेचे राजकारण यशस्वी ठरले तर याच प्रयोगाचे अनुकरण राज्यात होईल त्याचे श्रेय जिल्हाप्रमुखांना मिळेल.
 

Web Title: Platinum politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.