बाजीराव-मस्तानी चित्रपटा विरोधातील याचिका फेटाळली, पुण्यात शो हाऊसफुल्ल
By admin | Published: December 18, 2015 12:58 PM2015-12-18T12:58:04+5:302015-12-18T13:05:27+5:30
वादांमुळे गाजत असलेल्या बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - वादांमुळे गाजत असलेल्या बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पुण्यातील हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती.
चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपटातील काही गाण्यांवरही त्यांनी आक्षेप नोंदवला होता.
दरम्यान आज सकाळी पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कोथरुडच्या सिटी प्राईड चित्रपटगृहाजवळ निदर्शने केली. त्यामुळे सिटी प्राईडमधील बाजीराव-मस्तानीचे तिन्ही खेळ रद्द केले. मात्र पुण्यातील अन्य चित्रपटगृहात बाजीराव-मस्तानीचे शो हाऊसफुल्ल सुरु असल्याची माहिती मिळतं आहे. भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत प्रेक्षक हा सिनेमा पहायला चित्रपटगृहात जात आहेत.