राज्यात ठिकठिकाणी थंडीची सुखद चाहूल, पण प्रदूषणाचा विळखा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 05:49 AM2023-10-29T05:49:24+5:302023-10-29T05:49:56+5:30
मुंबईपाठोपाठ पुण्याची हवा देखील बिघडली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हवेची घसरलेली गुणवत्ता, धूळ, धुरके, त्यातच ऑक्टोबर हिट या सगळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आल्हाददायक बातमी आहे. ऑक्टोबर हिटने आता शहरातून काढता पाय घेतल्याचे संकेत असून गुलाबी थंडीचे चोरपावलांनी आगमन झाले आहे. शनिवारी त्याची प्रचीती आली. मुंबईच्या तापमानात घसरण होऊन पारा २१ अंश सेल्सिअसवर स्थिरावला.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानचेही तापमान तेवढेच भरले. त्यामुळे मुंबईकरांना शनिवार माथेरानमध्ये असल्यासारखा भासला. तापमानात उत्तरोत्तर घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
काही शहरांचे दिवसांचे कमाल तापमान ३२ ते ३६ सेल्सिअस अंशापर्यंत असल्याने दुपारी अजूनही उकाडा जाणवत आहे.
हे उपाय करा
- कॉर्पोरेशन क्षेत्रात ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांभोवती २५ फूट उंच कथील/धातूचे पत्रे बांधा.
- बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या कापडाने/ओल्या ताडपत्रीने बंदिस्त करा.
- सतत फॉगिंग करा. यामुळे हवेतील धूलिकणापासून बचाव होईल. साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- मोकळ्या जागेमध्ये पालापाचोळा किंवा घरगुती घनकचरा जाळण्यास निर्बंध. बेकरीमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी निर्देश द्यावेत.
खान्देश गारेगार
शनिवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे ११.४अंश नोंदविण्यात आले आहे.
शहरांचे किमान तापमान