भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येचा कट उधळला

By admin | Published: October 24, 2014 04:09 AM2014-10-24T04:09:41+5:302014-10-24T04:09:41+5:30

पुण्यातील एका भाजपा आमदाराच्या नातेवाईकाची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या छोटा शकील टोळीतील तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी जेरबंद केले.

The plot of the murder of the BJP worker has come to an end | भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येचा कट उधळला

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येचा कट उधळला

Next

मुंबई : पुण्यातील एका भाजपा आमदाराच्या नातेवाईकाची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या छोटा शकील टोळीतील तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून एक रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि चॉपर असा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.
नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश मिळवले आहे. याच राजकीय वैमनस्यातून पुण्यातील एका भाजपा आमदाराच्या मामाची आणि एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात येणार असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांच्या मदतीने देहूरोड येथील हवेली परिसरात सापळा रचला. मिळालेल्या वर्णनाचे तीन आरोपी त्याठिकाणी येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांना आमदाराच्या मामाचा फोटो आणि त्याचा पत्ता सापडला. तसेच त्यांच्याकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि चॉपर हस्तगत केला आहे.
मुख्य आरोपी हा देहूरोड येथील छोटा शकील टोळीचा म्होरक्या असून तो देहूरोड कँन्टोंमेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून देहूरोड परिसरात त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रसाठा जवळ बाळगणे आणि लूट असे २३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय इतर दोन आरोपी देखील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर देखील हत्या, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The plot of the murder of the BJP worker has come to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.