गुन्हेगारांना पावन करण्याची फडणवीसगिरी महागाची

By Admin | Published: February 15, 2017 02:46 AM2017-02-15T02:46:10+5:302017-02-15T02:46:10+5:30

राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना आपल्या पक्षात प्रवेश देत पावन करून घेत आहेत. ही फडणवीसगिरी पुण्याला कुठे घेऊन जाईल

Plunder to make the culprits clean | गुन्हेगारांना पावन करण्याची फडणवीसगिरी महागाची

गुन्हेगारांना पावन करण्याची फडणवीसगिरी महागाची

googlenewsNext

पुणे : राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना आपल्या पक्षात प्रवेश देत पावन करून घेत आहेत. ही फडणवीसगिरी पुण्याला कुठे घेऊन जाईल, सांगता येत नाही अशा टोकदार शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मांडीला मांडी लावून बसतात व परस्परांचे वाभाडेही काढतात, हे कसले राज्यकर्ते म्हणत त्यांनी भाजपा, शिवसेनेलाही धारेवर धरले.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातल्या महापालिका उमेदवारांच्या प्रचारार्थ येरवडा येथे मंगळवारी सायंकाळी पवार यांची सभा झाली. पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार बापू पठारे तसेच पक्षाचे या क्षेत्रातील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, हजगाच्या नकाशावर आज पुण्याचे प्रत्येक क्षेत्रात नाव आहे. केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणात देशातील पहिल्या ५ शहरांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. या दोन्ही शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.’’
त्यांच्या उमेदवारांच्या पदव्या म्हणजे ३०२ सारखे खुनाचे, दरोड्याचे गुन्हे, आमच्या उमेदवारांच्या पदव्या पहा. मुख्यमंत्री शिवसेनेला खंडणीबहाद्दर म्हणतात, उद्धव म्हणतात भाजपा गुंडाचा पक्ष आहे. राज्याच्या हिताची शपथ घेऊन हे सत्तेत आले, मांडीला मांडी लावून बसतात व अशी भांडणेही करतात. यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा सवाल पवार यांनी केला.
शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांचेही भाषण झाले. रवींद्र माळवदकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Plunder to make the culprits clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.