Modi In Maharashtra: पंतप्रधान मोदी औरंगाबादमध्ये; ऑरिक सिटीच्या हॉलचं उद्घाटन
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 11:33 AM2019-09-07T11:33:18+5:302019-09-07T15:30:00+5:30
Mumbai Metro Inauguration By PM Modi : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी महाराष्ट्रात
मुंबई: लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन महाराष्ट्रला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं भूमीपूजन करणार आहेत. याशिवाय तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबईनंतर मोदी औरंगाबादला रवाना होतील. या ठिकाणी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या भव्य हॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
LIVE
03:37 PM
पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक
03:30 PM
ऑरिक सिटीच्या हॉलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
03:11 PM
पंतप्रधान मोदी औरंगाबादमधील कार्यक्रमस्थळी दाखल; थोड्याच वेळात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या भव्य हॉलचं उद्घाटन
12:55 PM
विसर्जनानंतर प्लास्टिक समुद्रात, नाल्यात टाकू नका; मोदींचं मुंबईकरांना आवाहन
12:54 PM
गेल्या 5 वर्षात 400 किमी मेट्रोचं काम- मोदी
12:50 PM
लवकरच एक देश-एक तिकीट असेल- मोदी
12:49 PM
देशातील एकूण मेट्रो मार्गिकांपैकी निम्म्या मार्गिकांचं काम गेल्या 5 वर्षांत- मोदी
12:49 PM
लोकलमधून जितके प्रवासी करतात, तितकेच मेट्रोतून करतील- मोदी
12:47 PM
वर्षानुवर्षांपासून अडकून पडलेलं नवी मुंबई विमानतळाचं काम सुरू झालंय- मोदी
12:46 PM
मेट्रोचे डबेदेखील मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार होणार- मोदी
12:44 PM
सध्या मुंबईत 11 किमीची मेट्रो आहे, ती लवकरच 325 किमीवर जाईल- मोदी
12:44 PM
मुंबईत परिवर्तनाला सुरुवात झालीय- मोदी
12:43 PM
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर- मोदी
12:43 PM
100 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करणार- मोदी
12:41 PM
मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास मिनिटांवर येईल- मोदी
12:41 PM
इस्रोप्रमाणेच मुंबईकरदेखील स्पिरिटच्या बाबतीत मागे नाहीत- मोदी
12:40 PM
चंद्रावर पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण होणारच- मोदी
12:40 PM
उद्दिष्ट साध्य होईपर्यंत इस्त्रो थांबत नाही, थांबणार नाही- मोदी
12:39 PM
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून आपण शिकायला हवं- मोदी
12:39 PM
इस्त्रोतील शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र तन्मयतेनं काम केलं- मोदी
12:38 PM
मोंदीकडून उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ म्हणून उल्लेख
12:38 PM
शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारा पंतप्रधान जगानं मोदींच्या रुपात पाहिला- मुख्यमंत्री
12:20 PM
मेट्रो प्रकल्पांच्या तीन मार्गिकांचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन
12:18 PM
देशातील पहिली हायब्रिड मेट्रो नागपूरात- मुख्यमंत्री
12:17 PM
मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचं काम मेक इन इंडियाच्या अंतर्गत होईल- मुख्यमंत्री
12:16 PM
मेट्रो प्रकल्पांतील मानवी, तांत्रिक चुकींचं प्रमाण अत्यल्प असेल- मुख्यमंत्री
12:13 PM
इंटिग्रिटेड तिकीट सिस्टिमवर चालणारं मुंबई देशातलं पहिलं शहर असेल- मुख्यमंत्री
12:11 PM
मेट्रोमुळे प्रवास वेगवान होणार, वेळ वाचवणार- मुख्यमंत्री
12:10 PM
शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारा पंतप्रधान जगानं मोदींच्या रुपात पाहिला- मुख्यमंत्री
12:08 PM
मोदींनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची हिंमत दाखवली- मुख्यमंत्री
12:08 PM
महाराष्ट्राकडून मोदींचे आभार- मुख्यमंत्री
12:04 PM
आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी- उद्धव
12:03 PM
देशात क्षमता आहे, मोदींच्या रुपात नेतृत्त्व मिळालं- उद्धव
12:03 PM
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा संपूर्ण देशाला अभिमान- उद्धव
12:03 PM
संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव
12:03 PM
लवकरच अयोध्येत राम मंदिरही उभारू- उद्धव
12:01 PM
काश्मीरमधलं 370 कलम हटवण्याचं काम मोदींनी केलं- उद्धव
12:00 PM
मोदीजी, किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू- उद्धव ठाकरे
11:51 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित
11:50 AM
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचं मोदींकडून उद्घाटन
11:49 AM
पंतप्रधान मोदींकडून अद्ययावत मेट्रो भवनचं भूमीपूजन
11:49 AM
पंतप्रधान मोदी बीकेसीत पोहोचले; हजारो कार्यकर्ते उपस्थित
11:40 AM
विलेपार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरातील गणपतीचं मोदींकडून दर्शन
Mumbai: Prime Minister Narendra Modi offers prayers at Lokmanya Seva Sangh Tilak Mandir in Vile Parle. pic.twitter.com/qovGdZUP8k
— ANI (@ANI) September 7, 2019
11:38 AM
पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल; तीन मेट्रो प्रकल्पांचं भूमीपूजन करणार
PM Narendra Modi arrives in Mumbai, received by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari and CM Devendra Fadnavis. PM Modi will lay foundation stone for three metro lines in Mumbai. pic.twitter.com/VY4smmelrC
— ANI (@ANI) September 7, 2019