‘मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो’; पंतप्रधान मोदींच्या शिवशाहिरांना मराठीतून शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:01 AM2021-08-14T11:01:49+5:302021-08-14T11:03:15+5:30

देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा देणे ही खूप मोठी गोष्ट असल्याची भावना शिवशाहिरांनी व्यक्त केली.   

PM Narendra Modi wishes Babasaheb Purandare on 100th birthday | ‘मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो’; पंतप्रधान मोदींच्या शिवशाहिरांना मराठीतून शुभेच्छा

‘मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो’; पंतप्रधान मोदींच्या शिवशाहिरांना मराठीतून शुभेच्छा

Next

पुणे : ‘मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा उभा केलेला आदर्श आणि शिकवण आचरणात आणण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी, अशी मी प्रार्थना करतो...’ अशा मराठमोळ्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अभीष्टचिंतन केले. देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा देणे ही खूप मोठी गोष्ट असल्याची भावना शिवशाहिरांनी व्यक्त केली.   

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी तिथीनुसार वयाच्या शंभरीत पदार्पण केले. यानिमित्त त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यांचे १०० दिव्यांनी औक्षण करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे आणि  ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवशाहिरांना मानाचा मुजरा केला.

मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती बाबासाहेबांची असलेली निष्ठा आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी घेतलेली मेहनत याविषयी गौरवोद्गार काढले. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाचा इतिहास लिहिताना बाबासाहेबांसारखी प्रेरणा घेत प्रामाणिकतेच्या कसोटीवर लेखन करावे, असेही मोदी म्हणाले.

Web Title: PM Narendra Modi wishes Babasaheb Purandare on 100th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.