पंतप्रधानांनी उपकाराची भाषा करू नये - ओवैसी
By admin | Published: November 15, 2016 05:41 AM2016-11-15T05:41:59+5:302016-11-15T05:41:59+5:30
नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेवर उपकार केल्याची भाषा करीत आहेत. ‘मी देशासाठी घरदार सोडले,’ असे सांगत गोव्यातील
यवतमाळ : नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेवर उपकार केल्याची भाषा करीत आहेत. ‘मी देशासाठी घरदार सोडले,’ असे सांगत गोव्यातील भाषणात मोदी रडले. पण हीच भावुकता त्यांनी बँकांपुढे लागलेल्या सर्वसामान्यांच्या रांगा पाहून दाखविली असती तर बरे झाले असते. पंतप्रधानांनी नव्हे तर, जनतेने त्यांच्यावर उपकार केले आहेत, अशी टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली.
यवतमाळ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारास रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शहरातील समस्यांवर बोलताना देशपातळीवरील अनेक प्रश्नांबाबतही त्यांनी सरकारी धोरणांवर हल्लाबोल केला. देशाचे हजारो कोटी रुपये बुडवून विजय माल्ल्या, ललित मोदी, मोईन कुरेशी पळून जातात. पण आपल्याच
कष्टाचे हजार रुपये बँकेतून काढण्यासाठी सामान्य जनतेला सात-सात तास रांगेत उभे राहावे लागत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)