पंतप्रधानच निर्णय घेतील - गडकरी
By admin | Published: June 5, 2014 11:32 PM2014-06-05T23:32:46+5:302014-06-05T23:32:46+5:30
कोणता निर्णय घ्यायचा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ठरवतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक- महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
Next
>मुंडेंचा अपघाती मृत्यू : सीबीआय चौकशीची मागणी
नवी दिल्ली : ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी वाढत असतानाच या प्रकरणी कोणता निर्णय घ्यायचा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ठरवतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक- महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
मी काल पंतप्रधान आणि मुंडे यांच्या कुटुंबियांशी बोललो आहे. या प्रकरणी कशा प्रकारची चौकशी करायची, हा निर्णय मोदीच घेणार आहेत. लोकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निराकरण केले जाईल. या प्रकरणी सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.
अनेक नेत्यांकडून मागणी
मुंडे यांच्या अपघाताची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. रिपाइं नेते रामदास आठवले यांचाही सीबीआय चौकशीची मागणी करणा:या नेत्यांमध्ये समावेश होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनीही सीबीआय चौकशीची मागणी करीत कार्यकत्र्याच्या भावना विचारात घेतल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पवारांनीही केली चौकशीची मागणी
4गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत तथ्य बाहेर यावे ही त्यांच्या समर्थकांची मागणी पाहता सीबीआय चौकशी केली जावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रत म्हटले आहे.
4मुंडे यांचा मृत्यू अकाली आणि दुर्दैवी असून त्यांच्या मतदारसंघातील समर्थकांना जबर धक्का बसला आहे. त्यांनी सीबीआय चौकशीची जोरदार मागणी केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
4तथ्य बाहेर यावे यासाठी सीबीआय चौकशीची मागणी मान्य करावी, असे पवारांनी पत्रत म्हटले.