संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल"

By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 11:31 AM2021-01-15T11:31:56+5:302021-01-15T11:35:37+5:30

संजय राऊत यांच्या पत्नीनं ५५ लाख रूपये परत केल्याचा करण्यात आला आहे दावा.

pmc bank scam case sanjay raut wife money returned bjp leader kirit somaiya slams she need to give details | संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल"

संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल"

googlenewsNext
ठळक मुद्देपीएमसी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी राऊत यांच्या पत्नीला बजावण्यात आलं होतं समन्सराऊत यांनी ५५ लाख रूपये परत केल्याचा करण्यात आलाय दावा

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसूली संचलनालयानं नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला समन्स बजावलं होतं. संजय राऊत यांच्या पत्नीवर पीएमसी बँकेकडून काही कर्ज घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु आता संजय राऊत यांच्या पत्नीनं बँकेचे ५५ लाख रूपये परत केल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला.

"संजय राऊत म्हणाले त्यांच्या पत्नीनं पैसे परत केले आहेत. परंतु हिशोब तर द्यावाच लागणार. अखेर संजय राऊत यांना पैसे तर परत करावेच लागले. परंतु त्यांना हिशोबही द्यावाच लागेल," असं किरीट सोमय्या म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हे संपूर्ण प्रकरण पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाशी निगडीत आहे. 
 


वर्षा राऊत यांची चार जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून वर्षा राऊत यांच्या खात्यावर ५५ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. तसेच त्यांच्या चार कंपन्यांतील भागीदारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांना अटक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला मज्जाव केला आहे. मात्र, त्यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा कायम राहिला आहे.

प्रविण राऊत यांची सपत्ती जप्त

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं प्रविण राऊत यांची ७२ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली होती. या प्रकरणामध्ये ईडीने प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांच्याकडे कोटींची संपत्ती असल्याचा दावाही केला होता. हा पीएमसी बँक कर्ज प्रक्रियेत घोटाळा करून मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जप्त केली होती.

Web Title: pmc bank scam case sanjay raut wife money returned bjp leader kirit somaiya slams she need to give details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.