पीएमपी प्रवास दुचाकीपेक्षाही महागच

By admin | Published: August 24, 2016 01:08 AM2016-08-24T01:08:32+5:302016-08-24T01:08:32+5:30

पीएमपी तिकिटाच्या बाबतीत सर्वसामान्यांसाठी महागडी ठरत असल्याने लाखो प्रवासी खासगी वाहनांकडे वळले असल्याचे वास्तव आहे.

PMP travel is more expensive than two wheelers | पीएमपी प्रवास दुचाकीपेक्षाही महागच

पीएमपी प्रवास दुचाकीपेक्षाही महागच

Next

सुनील राऊत,
पुणे : तब्बल ६५ लाख पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिकांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपी तिकिटाच्या बाबतीत सर्वसामान्यांसाठी महागडी ठरत असल्याने लाखो प्रवासी खासगी वाहनांकडे वळले असल्याचे वास्तव आहे. खासगी वाहनांद्वारे प्रवासासाठी येणारा खर्च आणि पीएमपीचे तिकीट याबाबत शहरातील काही मार्गांवर प्रवास केला असता; बसपेक्षाही कमी खर्च येत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
या पाहणीत बसच्या प्रवासापेक्षा खासगी वाहनांच्या प्रवासासाठी लागणारा वेळ, येणारा खर्च, बसची तासन्तास वाट पाहण्यापासून सुटका, तसेच वेळेत प्रवास करणे अधिक सोपे असल्याचे समोर आले आहे. स्वारगेट ते मनपा, कात्रज ते निगडी, स्वारगेट ते सांगवी आणि मनपा ते चंदननगर या वेगवेगळ्या मार्गावर एकाच वेळी दुचाकी आणि पीएमपीने केलेल्या प्रवासातून हा अनुभव आला. सर्वसाधारणपणे बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या दुचाकी पाहता एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे ५0 किलोमीटर गाडी चालते. यावरून दुचाकीवर दोन व्यक्तींना येणारा खर्च आणि पीएमपीचे असलेले तिकीट यावरून पीएमपी
पुणेकरांसाठी महागच ठरत असल्याचे दिसून येते.
>का घटतेय प्रवासीसंख्या
बसला वेळापत्रकच नसणे
कमी अंतरासाठी न परवडणारे तिकीट
बसण्यासाठी जागाच न मिळणे
गाड्या कधीही बंद पडत असल्याने होणारी गैरसोय
प्रवासासाठी लागणारा भरमसाट वेळ
गाड्यांची दुरवस्था
ऐन कामाच्या वेळी ताटकळत राहावे लागणे
>दुचाकीचा खर्च ६० पैसे प्रति किलोमीटर
महानगर पालिका ते स्वारगेट हे अवघे साडेतीन किलोमीटरचे अंतर आहे. पीएमपीच्या तिकिट दराच्या स्टेज नुसारच्या रचनेमुळे या प्रवासाठी पहिले दोन किलोमीटर 5 रूपये आणि नंतर त्या पुढच्या दिड किलोमीटरच्या अंतरासाठी आणखी पाच रूपये असे दहा रूपये मोजावे लागले.
दुचाकी वरून प्रवास करताना या अंतरासाठी अवघे 4 रूपये 40 पैशांचा खर्च येतो. त्यातच दुचाकीवर दोन व्यक्ती असल्याने हा खर्च प्रती किलोमीटर अवघा 60 ते 65 पैसे येतो.
तर पीएमपीचे थांबे, गाडी मिळे पर्यंत लागणारा वेळ, बसण्यासाठी जागा न मिळणे, या समस्यांपासूनही सुटका मिळते. प्रामुख्याने शहरातील जवळपास 80 टक्के मार्गांवर हीच स्थिती आहे.
पीएमपीच्या तिकीट रचनेनुसार, प्रतिकिलोमीटर तिकिटाचा दर पाहिल्यास जवळचे अंतर महाग तर लांबच्या पल्ल्यांसाठी प्रतिकिलोमीटर दर स्वस्त आहे. याचा अनुभव घेण्यासाठी स्वारगेट ते सांगवी या १५ किलोमीटरच्या अंतरासाठी २0 रुपये प्रतिव्यक्ती.
मनपा ते चंदननगर या मार्गावर १२ किलोमीटरसाठी २0 रुपये प्रतिकिलोमीटर तिकीट आहे. हाच प्रवास दुचाकीने केल्यास प्रतिव्यक्ती अनुक्रमे १0 रुपये खर्च येतो. तर प्रतिकिमी १.२८ पैसे खर्च येतो.

पीएमपीचा प्रतिकिमी तिकीटखर्च १ रुपया ७0 पैसे येतो. म्हणजेच उपनगरात १ रुपया ७0 पैसे किमी दराने धावणारी पीएमपी जवळच्या ३ किमीच्या अंतरासाठी प्रवाशांकडून तब्बल साडेतीन रुपयांची आकारणी करताना दिसून येते.

Web Title: PMP travel is more expensive than two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.