माननीयांच्या ‘हट्टा’पायी पीएमपी सोसतेय तोटा

By admin | Published: January 17, 2017 01:16 AM2017-01-17T01:16:49+5:302017-01-17T01:16:49+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) माननीयांच्या हट्टापायी आणखी तोटा सहन करत आहे.

PMP's loss of honorable 'Hatta' | माननीयांच्या ‘हट्टा’पायी पीएमपी सोसतेय तोटा

माननीयांच्या ‘हट्टा’पायी पीएमपी सोसतेय तोटा

Next


पुणे : कमी होत चाललेले प्रवासी आणि त्यामुळे होणारा तोटा सहन करून पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) माननीयांच्या हट्टापायी आणखी तोटा सहन करत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील काही मार्ग तोट्याचे असूनही या मार्गावरून बस धावत आहेत. काही मार्गांची स्थिती तर खर्च ‘८० रुपये आणि उत्पन्न २० रुपये’ अशी असूनही माननीयांच्या दबावामुळे ‘पीएमपी’ तोटा सहन करत आहे.
निवडणुका जवळ आल्या की इच्छुकांकडून मतदारांना खूष करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. इतर नागरी सुविधशंच्या कामांबरोबरच आपल्या भागात पीएमपी बस आणण्यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. निवडणुकांचा बिगुल वाजल्याने त्यासाठी आता पीएमपी प्रशासनाकडे माननीयांचा हट्ट सुरू झाला आहे. मागील एक-दोन महिन्यांपासूनच काहींनी ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन बसमार्ग सुरू केले आहेत. हा हट्ट पुरवताना मात्र ‘पीएमपी’च्या नाकीनऊ येवू लागले आहे.
>कोणताही नवीन बसमार्ग सुरू करण्यासाठी ‘पीएमपी’कडून आधी या मार्गाचे सर्वेक्षण केले जाते. या भागातील प्रवाशांची संख्या, वाहतुकीची इतर साधने, रस्ता, सोयी-सुविधा, लोकसंख्या अशा विविध बाबींचा विचार केला जातो. त्यानंतर बसमार्ग सुरू करून ठराविक वेळा निश्चित केल्या जातात. मात्र, मागील काही वर्षांत विविध पक्षांच्या नेत्यांच्या हट्टामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. या हट्टापायी सध्या पीएमपीचे सुमारे ५० मार्ग तोट्यात चालले आहेत. त्यामुळे पीएमपीला महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मार्ग बंद करायचा किंवा मार्ग वळवायचा म्हटले तरी वरून दबाव येतो. त्यामुळे वर्षानुवर्षे तोट्याचे मार्ग सुरू असून, त्याचा आर्थिक फटका बसत आहे.
>पीएमपीचा नकार
पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या व प्रत्यक्ष मागणी याचा ताळमेळ घालणे प्रशासनाला कठीण जात आहे. ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक असल्याने सध्याच्या काही मार्गावरही नियमित बस धावणे कठीण होते. त्यामुळे नवीन मार्ग सुरू करणे सध्यातरी शक्य नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
>पीएमपीचे सुमारे 50 मार्ग तोट्यात महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान
मार्ग बंद करायचा किंवा मार्ग वळवायचा म्हटले तरी वरून दबाव येतो. वर्षानुवर्षे तोट्याचे मार्ग सुरू असून आर्थिक फटका बसत आहे.

Web Title: PMP's loss of honorable 'Hatta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.