पीएमआरडीएने नवे शहर उभारण्याचा विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:52 AM2018-05-13T04:52:08+5:302018-05-13T04:53:00+5:30

मुंबईच्या विस्तारानंतर नवी मुंबई हे एक नवे शहर उभे राहिले.

PMRDA should consider setting up a new city | पीएमआरडीएने नवे शहर उभारण्याचा विचार करावा

पीएमआरडीएने नवे शहर उभारण्याचा विचार करावा

Next

पुणे : मुंबईच्या विस्तारानंतर नवी मुंबई हे एक नवे शहर उभे राहिले. त्याचप्रमाणे पुणे महानगर विकास प्रधिकरणाने पुणे-अहमदनगर किंवा पुणे-मुंबईदरम्यान नवे शहर उभे करण्याचा विचार करावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिला.
पीएमआरडीएकडून तयार केल्या जाणाऱ्या रिंगरोडसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची व केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्य घ्यावे. तसेच भूसंपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही आवाहन गडकरी यांनी या वेळी केले. पुणे विभागीय राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत गडकरी बोलत होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी प्रस्तावित रिंगरोड बाबत सादरीकरण केले.

केंद्राने रिंगरोड भूसंपादनास निधी
द्यावा - मुख्यमंत्री
पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी १३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रिंगरोड भूसंपादनासाठी केंद्र शासनाने निधी द्यावा, अशी मागणी या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांच्याकडे केली. मात्र, एका राज्याला भूसंपादनास एवढा निधी दिला, तर देशातील सर्व राज्यांना द्यावा लागेल, असे गडकरी म्हणाले. त्यावर ९ हजार कोटी राज्य शासनाकडून उभा केला जाईल. उर्वरित ४ हजार कोटी केंद्राने द्यावे, असे फडणवीस यांनी सूचविले.

Web Title: PMRDA should consider setting up a new city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.