पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:19 AM2018-02-16T06:19:08+5:302018-02-16T06:19:32+5:30

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११४०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

PNB lost 11,400 crore; Six Big Banks Troubles | पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत

पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत

googlenewsNext

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११४०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. नीरव मोदीसह त्याचा भाऊ निशाल मोदी, पत्नी अमी मोदी, गीतांजली जेम्सचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक व नीरव मोदीचे मामा मेहूल चोक्सी, पंजाब नॅशनल बँकेचे माजी उप व्यवस्थापक गोकूलनाथ शेट्टी, मनोज खरात व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सध्या तपास सुरू आहे. पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी वगळता इतर सर्व आरोपी विदेशात पळून गेल्याची माहिती आहे. तसे असले तरी हा घोटाळा नेमका कसा झाला, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

घोटाळा नेमका कसा झाला?
सकृतदर्शनी हा घोटाळा नीरव मोदी याने व्यवस्थित कारस्थान रचून केल्याचे दिसते. यासाठी त्याने बँकेच्या अधिकाºयांशी संगनमत केल्याचेही दिसते. या अधिकाºयांकडून मोदीने लेटर आॅफ अंडरस्टँडिंग घेतले व त्यामार्फत विदेशातील बेनामी कंपन्यांना ११४०० कोटी रुपये विदेशी चलनात पाठविले.

एलओयू/एलसी काय आहे?
विदेशातून माल आयात करण्यासाठी मोठ्या कंपन्या एलओयू किंवा लेटर आॅफ क्रेडिट (एलसी)चा वापर करतात. बँकेने त्या ग्राहक कंपनीची घेतलेली ती एक प्रकारची हमी (गॅरंटी) असते. ही एलसी किंवा एलओयू विदेशातील कंपनीने तेथील बँकेला दाखवल्यास भारतातील बँक त्या बँकेला विदेशी चलनात रक्कम पाठवते व नंतर भारतातील ग्राहक कंपनीकडून व्याजासह वसूल करते. हा व्यवहार विशिष्ट कालावधीत (साधारणत: तीन महिने) पूर्ण करायचा असतो.

भारतातील सहा बँकांनाही बसणार फटका
आपल्या बेनामी कंपन्यांची विदेशात खाती उघडण्यासाठी नीरव मोदीने स्टेट बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया व अ‍ॅक्सिस बँकेच्या विदेशातील शाखांचा दुरुपयोग केल्याचे दिसते. या बँकांची चौकशी वित्त मंत्रालय सध्या करीत आहे.

बेनामी कंपन्या
यासाठी नीरव मोदी आणि कंपूने तीन बेनामी कंपन्याचा दुरुपयोग केल्याचे सध्यातरी दिसते. डायमंड आर यूएस, सोलर एक्सपोर्टस् व स्टेलर डायमंड्स अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यामार्फत ११४०० कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेने विदेशात पाठवले आहेत. मात्र हे सर्व व्यवहार बँकांच्या देशांतर्गत सीबीएस प्रणालीने न होता आंतरराष्टÑीय व्यवहारासाठी वापरल्या जाणाºया स्विफ्ट या मेसेज प्रणालीमार्फत झाले.
यामुळेच त्यांची पंजाब नॅशनल बँकेत कुठेही नोंद नाही. यावरून बँक अधिकाºयांचा सहभाग सिद्ध होतो.

प्रियंका चोप्राची तक्रार
अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही मोदीच्या ज्वेलरी ब्रँडची ‘ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ आहे. एका जाहिरातीची रक्कम न दिल्याप्रकरणी तिने नीरव मोदीविरुद्ध तक्रार दिलेली आहे.

ज्वेलरी कंपन्यांच्या समभागांना मोठा फटका
मुंबई : घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेअर बाजारात ज्वेलरी क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसला. गीतांजली जेम्सचे समभाग १९.९७ टक्क्यांनी घसरले. पी.सी. ज्वेलर्स, त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी, राजेश एक्स्पोर्ट्स यांचे समभागही घसरले.

दोषींविरुद्ध पूर्ण क्षमतेने कारवाई करणार
नीरव मोदी प्रकरणातील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दोषींविरुद्ध पूर्ण क्षमतेने कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या घोटाळ्याची सुरुवात २०११ मध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात फोर्ब्सच्या यादीत राहिलेले व्यावसायिक नीरव मोदीने कथितरीत्या मुंबईच्या शाखेतून एलओयू (लेडर आॅफ अंडरटेकिंग) प्राप्त केले होते. या आधारे अन्य भारतीय बँकांकडून विदेशातून कर्ज काढण्यात आले होते. पीएनबीने या प्रकरणात दहा अधिकाºयांना निलंबित केले आहे, तर प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे पाठविले आहे.
सुनील मेहता यांनी सांगितले की, गेल्या १२३ वर्षांत आम्ही खूप चढ-उतार पाहिले आहेत. बँकेची फसवणूक करणाºयांविरुद्ध पूर्ण क्षमतेने कारवाई केली जाईल आणि त्यांना शिक्षा दिली जाईल. आमच्या बँकेनेच हे प्रकरण शोधून काढले.

नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये?
नवी दिल्ली : नीरव मोदी हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच कुटुंबासह देश सोडून गेला असल्याची माहिती सीबीआय अधिकाºयांनी दिली. या अधिकाºयांनी सांगितले की, पीएनबीने २८० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात २९ जानेवारी रोजी सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्याचा भाऊ निशाल बेल्जियमचा नागरिक असल्याचेही सांगितले.

नीरव मोदी सरकारी शिष्टमंडळात नव्हता
नीरव मोदी स्वित्झर्लंडमधील डावोस येथे पंतप्रधानांसोबत गेलेल्या अधिकृत सरकारी शिष्टमंडळात नव्हता तर मोदी ‘सीआयआय’च्या शिष्टमंडळात होता, असा खुलासा केंद्रीय माहितीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी केला. नीरव मोदी याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे, विमानतळांवर त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधानांशी संबंधांचा गैरफायदा : राहुल गांधी
नीरव मोदी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांचा गैरफायदा घेत बँकेला फसविले, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. त्यांनी व्टिट केले आहे की, ‘नीरव मोदीकडून भारताला लुटण्याचे मार्गदर्शन. पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेतली. त्यांच्यासोबत दावोसमध्येही दिसले होते.

Web Title: PNB lost 11,400 crore; Six Big Banks Troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.