मृत्यूपश्चात कविता करकरेंचे अवयवदान

By admin | Published: September 30, 2014 02:44 AM2014-09-30T02:44:58+5:302014-09-30T02:44:58+5:30

दहशतवादी हल्ल्यात मुंबईकरांचे जीव वाचवण्यासाठी प्राणाची आहुती देणारे हेमंत करकरे जसे सा:यांच्या स्मरणात आहेत, तसेच स्मरण आता त्यांच्या पत्नी कविता करकरे यांचेही केले जाईल.

Poem after Poetry | मृत्यूपश्चात कविता करकरेंचे अवयवदान

मृत्यूपश्चात कविता करकरेंचे अवयवदान

Next
>अनेकांच्या आयुष्याला दिली उभारी : डोळे, किडनी, यकृत आणि त्वचा दान करण्याचा निर्णय
मुंबई : दहशतवादी हल्ल्यात मुंबईकरांचे जीव वाचवण्यासाठी प्राणाची आहुती देणारे हेमंत करकरे जसे सा:यांच्या स्मरणात आहेत, तसेच स्मरण आता त्यांच्या पत्नी कविता करकरे यांचेही केले जाईल. त्यांचा मेंदू मृतावस्थेत गेल्यानंतर (ब्रेनडेड) मुलांनी आपल्या आईचे डोळे, किडनी, यकृत आणि त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला. या अवयवदानामुळे अनेकांचे आयुष्य पुन्हा उभारी घेईल. 
कविता करकरे यांना सोमवारी सकाळी 11 वाजता हिंदुजा रुग्णालयात ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्या 57 वर्षाच्या होत्या. त्यांच्या डोक्याला जबर जखम झाल्यामुळे शनिवारी सकाळी त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळेपासूनच त्या बेशुद्धावस्थेत होत्या. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे हृदयाचे कार्य नियमित सुरू राहण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. यानंतर कविता करकरे यांच्या इतर काही तपासण्या करण्यात आल्यावर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटलवर ठेवण्यात आले होते. काहीतरी चमत्कार होईल आणि त्यांच्यात सुधारणा होईल, असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना वाटत होता. मात्र मंगळवार सकाळर्पयत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून आली नाही. यानंतर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आणि अखेर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)
 
अवयवांची होईल मदत
च्आई गेली, मात्र ज्यांना अवयवांची गरज आहे, त्यांना मदत व्हावी, याच हेतूने आईच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय तिन्ही मुलांनी मिळून घेतला. कविता करकरे यांचे डोळे, त्वचा, यकृत, किडनी हे अवयव दान करण्यात आले आहेत. 
च्करकरे यांचे यकृत कोकिलाबेन रुग्णालयात देण्यात आले आहे. एक किडनी हिंदुजा रुग्णालयातच देण्यात आली असून, दुसरी किडनी ही जसलोक रुग्णालयाला देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.  

Web Title: Poem after Poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.