एसटीची राज्यात १५0 मार्गांवर पॉर्इंट टू पॉर्इंट सेवा
By admin | Published: August 30, 2016 06:09 AM2016-08-30T06:09:48+5:302016-08-30T06:09:48+5:30
प्रवाशांचा प्रवास वेळ कमी व्हावा आणि लवकरात लवकर प्रवाशांना पोहोचता यावे यादृष्टीने ‘विना वाहक विना थांब्यांचा ‘पुणे पॅटर्न’संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.
मुंबई : प्रवाशांचा प्रवास वेळ कमी व्हावा आणि लवकरात लवकर प्रवाशांना पोहोचता यावे यादृष्टीने ‘विना वाहक विना थांब्यांचा ‘पुणे पॅटर्न’संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. राज्यातील जवळपास १५0 मार्गांवर अशी सेवा सुरु करण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
‘विना वाहक विना थांबा’ अशा फक्त पॉर्इंट टू पॉईट असणारी सेवा प्रथम पुणे-बारामती, पुणे-सातारा या मार्गावर काही वर्षांपूर्वी सेवा सुरु केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कोल्हापूर-इचलकरंजी आणि कोल्हापूर-सांगली मार्गावर सेवा सुरु करतानाच ठाणे-भिवंडी, ठाणे-बोरीवली, ठाणे-भार्इंदर, कल्याण-पनवेल, कल्याण-मुरबाडसह पनवेल-अलिबाग मार्गांवरही सेवा सुरु केल्या. या मार्गांवर एसटीला जवळपास ७0 ते ७३ टक्के प्रवासी भारमान मिळत आहे.
महामंडळाने दादर-पुणे चिंचवडमार्गे जाणाऱ्या ६८ फेऱ्यांपैकी सहा फेऱ्या या विना वाहक विना थांबा करण्यात आल्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने राज्यातील जवळपास १५0 मार्गांवर विना वाहक विना थांबांच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. हा विस्तार आणखी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)