दूध पाजूनही सापाने अखेर विषच ओकले...-भास्कर जाधव :

By admin | Published: October 12, 2014 10:53 PM2014-10-12T22:53:47+5:302014-10-12T23:31:54+5:30

राष्ट्रवादीच्या प्रचार मेळाव्यात सर्वच पदाधिकाऱ्यांची उदय सामंत यांच्यावर टीका

The poison is finally poisoned by milk ;- Bhaskar Jadhav: | दूध पाजूनही सापाने अखेर विषच ओकले...-भास्कर जाधव :

दूध पाजूनही सापाने अखेर विषच ओकले...-भास्कर जाधव :

Next

रत्नागिरी : सापाला दूध पाजले तर त्याच्या तोंडातून अमृत थोडेच बाहेर पडणार आहे? पक्षातीलच काही मंडळींनी हा साप पोसला होता. पक्षाने सर्व काही देऊनही गद्दारी करीत पक्षाबाहेर पडला व पक्षाच्या विरोधातच गरळ ओकला. त्यामुळे रत्नागिरीतील लढत ही गद्दार विरुध्द निष्ठावंत अशी असून, गद्दाराला एकदाच गाडून टाका, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांच्यावर केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस केशवराव भोसले, बाप्पा सावंत, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, उमेदवार बशीर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर, रामभाऊ गराटे, यासीन मामू आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, पक्षाने याला काय दिले नाही, दोनवेळा आमदारकी, राज्याच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद देऊनही पक्षाशी गद्दारी केली. तिसऱ्यांदा उमेदवारी देऊनही पक्षाने पैसे मागितल्याचे सांगत बदनामी करणाऱ्याला त्याची जागा मतदारांनी दाखवून द्यावी.
सांमत राष्ट्रवादीतून सेनेत गेल्यावर जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांना मी विचारले, जो राष्ट्रवादीचा, स्वत:च्या कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो शिवसेनेचा होईल? त्यावर महाडिक म्हणाले, आम्ही त्यांना स्वीकारले आहेच, परंतु खांद्यावरही बसविले आहे. त्यावर मी म्हणालो, आमच्याकडे हेच झाले. काहींनी त्यांना खांद्यावर बसविले, त्यांचे कपडे घाण झाले. तुम्ही कान सांभाळा, असा सल्ला दिला आहे. मी पण २००४ मध्ये शिवसेना पक्ष सोडला होता. मला दिलेली उमेदवारी अचानक काढून घेतली. त्यामुळे मी पक्षाच्याच कार्यालयात बसून रितसर राजीनामा दिला होता. माझ्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. येथे तर पक्षाने सर्वकाही दिले. तिसऱ्या वेळचा उमेदवारीचा एबी फॉर्मही दिला तरी गद्दारी झाली हे न पटणारेच आहे, असेही ते म्हणाले.
पक्षाने अन्याय केला, उमेदवारीसाठी पैसे मागितले असे जर

भाषण करताना भास्कर जाधव रडले
पाच वर्षांपूर्वी पावसमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्यावेळी एकाच व्यासपीठावर असताना तटकरे मला उद्देशून बोलले होते की, माझ्या निष्ठेबाबतच त्यांनी संशय घेतला होता. त्यावेळी मी प्रचंड अस्वस्थ झालो. पवारांवर निष्ठा असलेल्या माझ्यावर असा आरोप भर सभेत व्हावा, हे दुर्दैवी होते. त्याचक्षणी मला वाटले पक्ष सोडावा. परंतु कुमार शेट्ये यांनी मला सावरले. मात्र, माझ्या निष्ठेबद्दल शंका घेणाऱ्यांची निष्ठा खरी की, माझी खरी, हे स्वामी स्वरुपानंद व शारदादेवीवरच सोपवले. मी गद्दार असेन तर मला शिक्षा व्हावी, जर दुसरा कोणी असेल तो जगासमोर येऊदे. २६ सप्टेंबर २०१४ रोजी गद्दार कोण हे जगासमोर आलेच. पालकमंत्रीपदाच्या माझ्या साडेतीन वर्षांच्या काळात या माणसाने विरोधकांशी हातमिळवणी करीत मला प्रचंड त्रास दिला, असे म्हणत भास्कर जाधव ओक्साबोक्सी रडले. त्यामुळे भावविवश झालेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: The poison is finally poisoned by milk ;- Bhaskar Jadhav:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.