माध्यान्ह भोजनातील खिचडीतून ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

By Admin | Published: February 25, 2016 07:10 PM2016-02-25T19:10:08+5:302016-02-25T19:10:08+5:30

जिल्हा परिषद शाळा कासा बुद्रुक येथील ५० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे

Poisoning to 50 students from mid-day meals | माध्यान्ह भोजनातील खिचडीतून ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

माध्यान्ह भोजनातील खिचडीतून ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पालघर, दि. २५  - कासा येथिल विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कासा बुद्रुक येथील ५० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली असून त्यांना तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५० विद्यार्थामधील १७ जणांची प्रकृती चिंचाजनक असल्याचे सांगण्यात रुगणालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. 

इस्कॉन मार्फत पुरविण्यात येणारी खिचडी खाल्याने विद्यार्थ्यांना मळमळ, चक्कर, उलट्या असा त्रास होउ लागल्यावर विषबाधा झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. २४७ विद्यार्थ्यांच्या तपासणी अंती ५० जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Poisoning to 50 students from mid-day meals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.