खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषबाधा
By Admin | Published: February 20, 2016 10:40 PM2016-02-20T22:40:56+5:302016-02-20T22:50:41+5:30
मध्यांन भोजनात देण्यात येणाऱ्या खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषधाबा झाली. ही घटना नागपूर जवळील राजीवनगर भागातील शांती निकेतन विदयालयात शनिवारी घडली. सर्व विदयर्थ्यांचे प्राण धोक्याबाहेर आहे.
>नागपूर, दि. २० - मध्यांन भोजनात देण्यात येणाऱ्या खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषधाबा झाली. ही घटना नागपूर जवळील राजीवनगर भागातील शांती निकेतन विदयालयात शनिवारी घडली. सर्व विदयार्थ्यांचे प्राण धोक्याबाहेर आहेत.
आज दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्ग १ ते ७ वीच्या विदयार्थ्यांना खिचडी देण्यात आली. जवळपास ३०० विदयार्थ्यांना ही खिचडी देण्यात आली. काही वेळयांनीच अनेक विदर्थ्यांना मळवाटु लागले व काहींनी उलटया करण्यास सुरुवात केली. येथील शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मिळले त्या वाहनांना ५४ विदयार्थ्यांना सुरुवातीला हिंगणा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परंतु या पैकी २६ विदयार्थीची प्रकुती खालवत गेली. यामुळे नंतर त्यांना नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व विदयार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून यापैकी बराच विदयार्थ्यांना रात्री उशीरा सुटी सुध्दा देण्यात आली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पोहचताच शाळेबाहेर व हिंगणा येथील ग्रामिण रुग्णालयाच्या बाहेर पालकांची मोठी गर्दी झाली होती. प्राथमीक अहवालातुन अन्नातुन विषबाधा झाल्याने हा प्रकार झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.