बारामतीच्या कुटुंबाला विषबाधा; युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:51 AM2017-07-27T03:51:20+5:302017-07-27T03:51:20+5:30
मांढरदेव येथे देवदर्शनासाठी आलेल्या बारामतीमधील एका युवकाचा विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील विष्णू चव्हाण असे त्याचे नाव आहे.
वाई (जि. सातारा) : मांढरदेव येथे देवदर्शनासाठी आलेल्या बारामतीमधील एका युवकाचा विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील विष्णू चव्हाण असे त्याचे नाव आहे.
बारामती येथील चव्हाण कुटुंबीय बुधवारी दुपारी देवदर्शनासाठी मांढरदेव येथे आले होते. दर्शन घेऊन दुपारी तीनच्या सुमारात ते वाईच्या दिशेने निघाले. मांढरदेव घाटात आल्यानंतर स्वप्नील चव्हाण याच्या तोंडातून अचानक फेस येऊ लागला. थंडी वाजू लागल्याने तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तत्काळ वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चव्हाण कुटुंबातील मुक्ताबाई चव्हाण (५८), तृप्ती चव्हाण (१६), सुनीता चव्हाण (४५), प्रतीक्षा चव्हाण (२१) व चालक भीमसेन जाधव (२८) यांंनाही थंडी वाजू लागल्याते ते अत्यवस्थ झाले. त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.