सोलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई, देहविक्रीपासून नऊ मुलींना रोखले

By admin | Published: July 11, 2016 09:24 PM2016-07-11T21:24:20+5:302016-07-11T21:30:16+5:30

देहविक्रीसाठी मुंबईकडे निघालेल्या नऊ मुलींना कोनार्क एक्सप्रेसमधून पकडण्यात आरफीएफ जवानांनी पकडून सदर बझार पोलिसांच्या हवाली केले.

Police action at Solapur railway station, preventing nine girls from sexually transmitting | सोलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई, देहविक्रीपासून नऊ मुलींना रोखले

सोलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई, देहविक्रीपासून नऊ मुलींना रोखले

Next

ऑनलाइन लोकमत,

सोलापूर, दि. 11 - देहविक्रीसाठी मुंबईकडे निघालेल्या नऊ मुलींना कोनार्क एक्सप्रेसमधून पकडण्यात आरफीएफ जवानांनी पकडून सदर बझार पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्या कामगिरीमुळे देहविक्री व्यवसायात ढकलल्या जाणाºया या मुलींची मुक्तता करण्यात यश आले आहे. मात्र यातील सूत्रधार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र. ३ वर उघडकीस आला. संबंधित मुलींना सदर बझार पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात येत आहे.

आरफीएफ दलाच्या एका वरिष्ठ अधिका-यास देहविक्रीसाठी मुलींना घेऊन जाणारी एक टोळी रेल्वेने निघाल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान वेगाने सूत्रे वेगाने हलली. आरपीएफ जवानाचे एक पथक तातडीने रेल्वेस्थानकावर पोहचले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोनार्क एक्सप्रेस थांबताच हे पथक डबा क्रमांक १० मध्ये शिरले. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ संशयित मुलींसह दोघा दलालांना ताब्यात घेतले. मात्र याचवेळी प्रमुख सूत्रधार या पथकास चकमा देऊन पळून गेला. आरपीएफचे निरीक्षक आशिषकुमार सिन्हा, उपनिरीक्षक सिन्हा, सचिनकुमार, पवनकुमार आणि हवालदार अजय चौरासिया यांच्या पथकाने ही कामगिरी केली. ताब्यात घेतलेल्या नऊ मुलींना सदर बझार पोलिसांच्या ताब्यात दिले असून. सहा. पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींजवळील साहित्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या बॅगेत कपडे, शैक्षणिक साहित्य, खाद्यपदार्थ आढळले. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व मुली १२ ते १४ वयोगटातील असून, एक तरुणी २० ते २५ वयोगटातील आहे.

मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींची कसून चौकशी करीत असून, या चौकशीत देहविक्री करणाºया मोठ्या टोळी उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतेच शेजारच्या उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून देहविक्री करणारे प्रकरण गाजत आहे. तेथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे आणि ताब्यात घेतलेल्या मुलींचे काही कनेक्शन आहे याचाही तपास सुरु आहे.

 संबंधित मुलींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी करुन मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुख्य आरोपी फरार झाला झाला आाहे. त्याच्या शोधार्थ पोलीस मार्गावर आहेत.
-शर्मिष्ठा वालावलकर 
सहा. पोलीस उपायुक्त

Web Title: Police action at Solapur railway station, preventing nine girls from sexually transmitting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.