जळगावात पोलीस आणि आरोपीत फायरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2016 06:00 PM2016-11-01T18:00:18+5:302016-11-01T18:16:02+5:30
पुणे, नगर जिल्ह्यात अनेक घरफोड्या, बँक लूट गुन्ह्यामधील मधील वर्षभरापासूनचा फरार असलेला व सध्या चाळीसगाव शहरात वास्तव्यास असलेल्या आरोपीला
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.01 - पुणे, नगर जिल्ह्यात अनेक घरफोड्या, बँक लूट गुन्ह्यामधील मधील वर्षभरापासूनचा फरार असलेला व सध्या चाळीसगाव शहरात वास्तव्यास असलेल्या आरोपीला पोलिसांनी येथे पकडले.यावेळी त्याची पुणे येथील पोलीसांची चकमक झाली. आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांवर गोळीबार केला. तर पोलिसांनीही त्याच्यावर गोळी झाडली असता त्याच्या पायाला लागून तो जखमी झाला व पोलिसांच्या तावडीत सापडला. ही घटना १ रोजी सकाळी ७ वाजता घडली.
आरोपीचे नाव सचिन अप्पा इथापे (वय २६, रा.कोंडेगव्हाण ता.पारनेर जि.अहमदनगर) असे असून पुणे नगर, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या घरफोड्या, बँक लूट, रस्तालुटीत तो आरोपी आहे. गेल्या एक-दीड वर्षापासून तो फरार होता.
चाळीसगाव येथील धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोल पंपा मागील माधवनगरात प्लॉट नं.८५ मध्ये त्याने घर बांधले होते. साधारणत: एक-दीड वर्षापासून त्याचे येथे वास्तव्य होते. घरात आई व पत्नी राहात असे.
अनेक गुन्हे त्याने केल्यामुळे पुणे एलसीबी पोलीस त्याच्या मागावर होते. गुप्त माहिती मिळताच पुणेएलसीबी पथकातील पोउनि अंकुश माने व इतरांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता त्याच्या घराजवळ सापळा लावला. यावेळी त्याने घराच्या मागील बाजुने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पाठलाग करत असतना आरोपी सचिनने त्याच्या ताब्यातील कार्बाईन गनने दोन गोळ्या पोलिसांवर झाडल्या परंतु कोणास इजा पोहचली झाली नाही. पोलीसांनी प्रत्युउत्तरात फायर केले. असता सचिनच्या डाव्या पायाला गोळी लागली. त्यास अटक करुन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
आरोपी सचिन जवळ असलेली गन पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात ६ जिवंत गोळ्या पोलिसांनी जप्त केली आहे. ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली असून परिसरातील नागरिक पाहण्यासाठी गर्दी केली होती.
आरोपी सचिनने पुणे जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक गुन्हे केले असून तो एक-दीड वर्षापासून चाळीसगावात वास्तव्यात होता. येथे तो ‘शिवाजी पाटील’ या नावाने राहात होता. त्याला पकडण्यासाठी एलबीसी पथकात पोउनि अंकुश माने, हवालदार दत्तात्रय गिरीमकर, पोकाँ बाळासाहेब सकाटे, निलेश कदम, अनिल कोकणे, लियाकत मुजावर, पल्लवी गायकवाड व ढम्मरे यांचा समावेश होता. दरम्यान पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.
पोलीस होते मागावर
१० सप्टेंबर रोजी यवत येथे पुणे मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडा पडला होता. यात ६६ लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती. याच्या तपासासाठी पुणे अन्वेषण शाखा पोलीस सचिन याच्या मागावर होते. तो चाळीसगाव येथे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी १ रोजी पहाटे त्याला पकडण्यासाठी सापळा लावला.
चाळीसगाव येथे मालमत्ता
सचिन याने चाळीसगाव येथे धुळे रोडलगत मोठे घर विकत घेतले आहे. त्याच्या बंगल्याचे बांधकामही सुरु आहे. त्याच्याकडे कार्पिओ, जेसीबी व पाण्याचे टँकर व ट्रॅक्टर तसेच पंजाब पासिंगची मोटरसायकल मिळून आली.
दुसरा आरोपी पळाला
पोलिसांना हवा असलेला दुसरा आरोपी ज्ञानेश्वर माऊली लोहेकर उर्फ दीपक दादासाहेब देशमुख हा मात्र या ठिकाणाहून निसटण्यास यशस्वी झाला.
कार्बाईन गन जप्त
सचिन याने त्याच्याकडील कार्बाईन गन मधून पीएसआय अंकुश माने यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. काररवाईत ही गन व सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे.