पोलिसाच्या दुचाकीने सायकलस्वार ठार
By admin | Published: August 17, 2015 12:37 AM2015-08-17T00:37:50+5:302015-08-17T00:37:50+5:30
पोलिसाच्या दुचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार पुसद नगर परिषदेचा सफाई कामगार ठार झाल्याची घटना येथे घडली. सोमवारी झालेल्या या अपघातात जखमी
पुसद : पोलिसाच्या दुचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार पुसद नगर परिषदेचा सफाई कामगार ठार झाल्याची घटना येथे घडली. सोमवारी झालेल्या या अपघातात जखमी सायकलस्वाराचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला.
भाऊराव गणपत गोमासे (३५) रा. निंबी असे मृताचे नाव आहे. सोमवारी तो नगर परिषदेतील काम आटोपून आपल्या गावी निंबी येथे सायकलने जात होता. त्याच वेळी खंडाळा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पंडित राठोड आपल्या दुचाकीने पुसदकडे येत होते. येथील आयुर्वेद महाविद्यालयाजवळ दुचाकीने सायकलला धडक दिली. त्यात भाऊराव गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला पुसदच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला नांदेड येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला.