गोल्डनमन दत्ता फगे खुनातील आरोपीना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Published: July 21, 2016 07:12 PM2016-07-21T19:12:33+5:302016-07-21T19:12:33+5:30

गोल्ड मॅन दत्ता फुगे याच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलिस कोठडी, तर दोघांची न्यायालयीन कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना खडकी न्यायालयात हजर करण्यात आले

Police closet till July 25, accused of murder in Golden Nmana Duggal | गोल्डनमन दत्ता फगे खुनातील आरोपीना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

गोल्डनमन दत्ता फगे खुनातील आरोपीना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपरी- चिंचवड, दि. 21 : गोल्ड मॅन दत्ता फुगे याच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलिस कोठडी, तर दोघांची न्यायालयीन कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना खडकी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी नऊ जणांना सोमवार (दि.२५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अतुल अमृत मोहिते (२५), शौकत मुनीर आत्तार (२४), सुशांत जालिंदर पवार (२०), तुषार कान्हू जाधव (२०, सर्व रा. भारतमातानगर, दिघी), अतुल ऊर्फ
बल्ली कैलास पठारे (२४, रा. म्हस्के वस्ती, आळंदी रोड), शैलेश सूर्यकांत वाळके (२६, रा. यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (३२, रा. विश्रांतवाडी), निवृत्ती ऊर्फ बाळू किसन वाळके (४५, विठ्ठल मंदिराजवळ दिघी) आणि प्रेम ऊर्फ कक्का ऊर्फ प्रमोद संताराम ढोलपुरिया (२३, रा. रामनगर, बोपखेल) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

दत्तात्रय ज्ञानेश्‍वर फुगे याचा दिघी येथे गुरुवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास टोळक्याने दगडाने ठेचून, हत्याराने वार करून खून केला. याप्रकरणी फुगे याचा मुलगा शुभम फुगे (२१, रा. भोसरी) याने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या टोळक्याने गोल्ड मॅन दत्तात्रय फुगे याला मित्राच्या वाढदिवसाचे निमित्त करून दिघी येथे बोलावून घेतले. त्यानंतर चिटफंडमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशाच्या देण्या-घेण्यावरून दत्तात्रय फुगे याच्यावर तलवार, कोयता, चॉपर आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खुनातील सर्व मारेकरी फरार झाले होते.

दिघी पोलिसांनी तपास करून पहिले पाच आणि नंतर चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या नऊ जणांना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी आणि सात जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी न्यायालयीन कोठडी संपल्याने दोघांना आणि गुरुवारी पोलिस कोठडी संपल्याने सात जणांना खडकी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी सर्व आरोपींना आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या खुनामागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, यामागे वेगळे कारण आहे का, फरार आरोपींचा शोध करणे, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करणे यासाठी तपास अधिकार्‍याने सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. तपास पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे करत आहेत.

Web Title: Police closet till July 25, accused of murder in Golden Nmana Duggal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.