पोलीस हवालदाराचा मुलगा राज्यात पहिला
By Admin | Published: March 23, 2017 02:58 AM2017-03-23T02:58:50+5:302017-03-23T04:59:30+5:30
पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या मुलाने लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन भारतीय वन सेवेमध्ये देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
पुणे : पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या मुलाने लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन भारतीय वन सेवेमध्ये देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
पोलीस हवालदार सुरेश जगताप आणि त्यांचा मुलगा किरण यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जगताप यांनी शहरातील विशेष शाखा, गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यात काम केले आहे. त्यांचा मुलगा किरण याला त्यांनी जिद्दीने शिकवले. किरणने बीएसस्सी अॅग्रीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी दिल्ली गाठली. भविष्य निर्वाह निधी विभागाच्या सहायक आयुक्त पदावर त्याची निवड झाली होती. त्याने जानेवारीमध्ये पदभारही स्वीकारला होता. त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात त्याने दिलेल्या यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. भारतीय वन सेवेमध्ये तो देशात सातवा तर राज्यात पहिला आला. किरण १० वीच्या बोर्डामध्ये १४ वा आला होता. तर १२ वीत बोर्डात १२ वा आला होता. (प्रतिनिधी)