सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही जणांना पोलीस कोठडी
By admin | Published: July 24, 2016 02:54 AM2016-07-24T02:54:35+5:302016-07-24T02:54:35+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १७ ते २० जुलैदरम्यान
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १७ ते २० जुलैदरम्यान तिच्यावर पाच तरुणांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आळीपाळीने बलात्कार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनी घरच्या लोकांवर नाराज होऊन घराबाहेर पडली होती. १७ जुलै रोजी ती गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. ४वर असताना तिला आपुलकी दाखवित दोन युवकांनी सूर्याटोला येथे मोटारसायकलवरून नेले. त्यानंतर कुंभारेनगरातील परिसरात असलेल्या एका खोलीत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. २१ जुलैपर्यंत तिच्यासोबत भीमनगर व शास्त्री वार्ड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात केला.
या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही या घटनेचे पडसाद उमटले. (प्रतिनिधी)