समृद्ध जीवनच्या लिना मोतेवार यांना पोलीस कोठडी
By admin | Published: August 11, 2016 08:51 PM2016-08-11T20:51:25+5:302016-08-11T20:51:25+5:30
समृद्ध जीवन फुडस इंडिया या कंपनीची संचालक लिना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हि-यांच्या दागिन्यांची
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - समृद्ध जीवन फुडस इंडिया या कंपनीची संचालक लिना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हि-यांच्या दागिन्यांची खरेदी केली असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे़ महेश मोतेवारलाअटक झाल्यानंतर त्या दुसºयाच्या नावावर भाड्याने घेतलेल्या घरात रहात असल्याची माहिती मिळाल्यावर सीआयडीने बुधवारी त्या ठिकाणाहून अटक केली़ विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी लिना मोतेवार यांना २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़
समृद्ध जीवन फुड इंडिया या कंपनीविरुध्द राज्यातील विविध जिल्ह्यासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत़ सर्व आर्थिक गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे़ चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सीआयडीने लिना मोतेवार (वय ३७, रा़ विद्यादीप सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) यांना अटक केली़ या प्रकरणात महेश मोतेवार आणि राजेंद्र भंडारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस़ जे़ काळे यांच्या न्यायालयात सीआयडीने गुरुवारी लिना मोतेवार यांना हजर केले़ अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल सुनिल हांडे यांनी सांगितले की, लिना मोतेवार या कंपनीची ५० टक्के शेअर होल्डर होती़ २०१३ मध्ये त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० शेअर्स असून त्यापैकी हा १७़११ टक्के हिस्सा आहे़ कंपनीच्या वाहनचालकाच्या घरी ठेवलेले १ कोटी रुपयांचे दागिने आरोपीचे असून त्याबाबत तपास करायचा आहे़ धनकवडी येथील घरात आरोपीच्याच फिंगर प्रिंटने लॉकर उघडले जाऊ शकते अशीच आणखीही लॉकर असण्याची शक्यता आहे. महेश मोतेवार अटकेत असताना आरोपीने कंपनीशी निगडीत असलेल्या विविध मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत़ कंपनीने त्यांना २००८-०९ ते २०१३ -१४ दरम्यान २० कोटी रुपयांचे कर्ज व अग्रीम स्वरुपात देण्यात आले आहे़ तसेच पगाराच्या स्वरुपात ६३ लाख रुपये दिले आहेत़ या रक्कमा कोणत्या उद्देशाने दिल्या, याचा तपास करायचा आहे़ गुंतवणुकदारांकडून गोळा केलेल्या पैशातून स्वत: करीता, कुंटुबाकरीता स्थावर मिळकती, जंगम मालमत्ता खरेदी केली आहे, त्याचा तपास करायचा आहे़ वेगवेगळ्या राज्यात गुंतवणुक केली आहे़ त्याचा तपास करायचा आहे़
आरोपी वापरत असलेली मोटार कंपनीच्या नावावर आहे़ त्या स्वत:ची ओळख लपवत असल्याने वारंवार शोधूनही त्या सापडल्या नाहीत़ त्यामुळे न्यायालयाकडून वॉरंट मिळविले होते़ समृद्ध जीवन फुडसच्या मालमत्ताची माहिती, कंपनीचे संचालक, बेनामी, नातेवाईक इत्यादींच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहेत व ते विकत घेण्यासाठी पैसे कोठून व कशा प्रकारे ट्रान्सफर झाले याबाबत तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले़ न्यायालयाने अधिक तपासासाठी २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़
सीआयडी तपासात पुढे आलेली माहिती...
* समृद्ध जीवन फुडस कंपनीची लिना मोतेवार ५० टक्के शेअर होल्डर
* तीन प्रमुख शेअर होल्डरपैकी एक
* महेश मोतेवार यांच्या अटकेनंतर कंपनीची मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
* संचालक असलेल्या लिना मोतेवार यांना कंपनीनेच दिले २० कोटी रुपये कर्ज
* अनेक राज्यात दाखल आहेत गुन्हे
* कंपनीच्या ग्राहकांची संख्या व उपलब्ध लाईव्ह स्टॉकची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत
* समृद्ध जीवनच्या गु्रपमधील अनेक कंपनीत त्या संचालक
* पुण्यातील प्रसिद्ध सराफाकडील खाते उताºयानुसार ४४ वेगवेगळ्या व्यवहारातून १ कोटी ६२ लाख रुपयांची सोने, हिºयाच्या दागिन्यांची खरेदी