भाऊसाहेब चव्हाणला १९ मेपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Published: May 14, 2016 02:52 AM2016-05-14T02:52:53+5:302016-05-14T02:52:53+5:30

राज्यातील गुंतवणूकदारांची सुमारे २१० कोटींची फसवणूक करणारा केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती

Police custody till Bhausaheb Chavan till May 19 | भाऊसाहेब चव्हाणला १९ मेपर्यंत पोलीस कोठडी

भाऊसाहेब चव्हाणला १९ मेपर्यंत पोलीस कोठडी

Next

नाशिक : राज्यातील गुंतवणूकदारांची सुमारे २१० कोटींची फसवणूक करणारा केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी शुक्रवारी १९ मेपर्यंत वाढ केली़ आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चव्हाण दाम्पत्याच्या शहरातील विविध बँकांच्या चार लॉकरमधून सुमारे तीन कोटींचा ऐवज जप्त केला असून, आणखी एका लॉकरची तपासणी बाकी आहे़
केबीसी घोटाळ्यानंतर सिंगापूरला फरार झालेले भाऊसाहेब व आरती चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेने ६ मे रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळावर अटक केली़ यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ या पोलीस कोठडीतील चौकशीमध्ये शहरातील विविध बँकांमध्ये पाच लॉकर असल्याची माहिती चव्हाणने पोलिसांना दिली होती़
आर्थिक गुन्हे शाखेने चव्हाणच्या चार लॉकरमधील २ कोटी ६५ लाख रु पयांचा ऐवज शोधून काढला आहे़ तर पाचव्या लॉकरची तपासणी बाकी असून त्यामध्ये केबीसीच्या ठेवीतून खरेदी केलेल्या मालमत्तेची कागदपत्रे असण्याची शक्यता आहे़ दरम्यान, आतापर्यंत केबीसीची सुमारे ८३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून उर्वरित पोलीस कोठडी कालावधीत नाशिकसह सिंगापूरमधील मालमत्ता बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police custody till Bhausaheb Chavan till May 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.