पोलिसांनी केली महिलेची स्टेशनवर डिलिव्हरी
By admin | Published: June 22, 2017 11:30 AM2017-06-22T11:30:49+5:302017-06-22T11:36:30+5:30
ठाणे रेल्वे स्टेशनवर RPF पोलिसांनी एक महिलेची यशस्वीरित्या डिलिव्हरी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - बदलापूर येथील रहिवासी जान्हवी जाधव आपल्या पतीसहीत ट्रेननं ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये जात होती. जान्हवी 9 महिन्यांची गरोदर होती. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी तिला प्रसूती कळा सुरु झाल्या व तिनं ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वरच आपल्या बाळाला जन्म दिला.
ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचताच जान्हवीला प्रसूती कळा सुरू झाल्या तेव्हा RPF जवान आणि अन्य प्रवासी तिच्या मदतीसाठी धावले. जान्हवी ठाणे रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. याची माहिती RPFला मिळताच त्यांनी जान्हवीला मदत करत प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर आणले.
त्यानंतर चारही बाजूंनी चादर लावण्यात आली. यावेळी RPF कॉन्स्टेबल शोभा मोटेदेखील जान्हवीच्या मदतीसाठी तेथे पोहोचल्या. अन्य महिला प्रवाशी जान्हवीला घेरून उभ्या राहिल्या व तिची सुखरुप प्रसुती करण्यात आली. जन्हवीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दरम्यान, जान्हवी आणि बाळ दोन्ही सुरक्षित असून त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
RPF पोलीस निरीक्षक दिनेश नायर यांनी सांगितले की, जान्हवीला मदत करणा-या महिला प्रवाशांपैकी एक जण नर्स होती. नर्स व मोटे यांनी मिळून जान्हवीची डिलिव्हरी करण्यासाठी मदत केली.
A lady passenger delivered a baby boy at PF10 of Thane stn with timely assistance of RPF LHC Shobha Mote & passenger nurse. @sureshpprabhupic.twitter.com/870mGMgoxw
— Central Railway (@Central_Railway) June 21, 2017