हसनैन वरेकरनेच कुटुंबियांची हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट
By admin | Published: March 5, 2016 05:39 PM2016-03-05T17:39:05+5:302016-03-05T18:08:32+5:30
68 लाखांच कर्ज आणि गतीमंद बहिणीसोबत करत असलेले लैंगिक चाळे लपवण्यासाठी हा हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
ठाणे, दि. ५ - हसनैन वरेकरनेच आपल्या कुटुंबियांची हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ही माहिती दिली आहे. 68 लाखांच कर्ज आणि गतीमंद बहिणीसोबत करत असलेले लैंगिक चाळे लपवण्यासाठी हा हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. साखरझोपेत असलेल्या आई, वडील, पत्नी, तीन बहिणींसह दोन मुली आणि बहिणींची मुले अशा आपल्याच कुटुंबातील एकूण १४ जणांची हसनैन वरेकरने हत्या केली होती. त्यानंतर, स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हत्याकांडातून त्याची बहीण सुबिया सुदैवाने बचावली. मात्र हत्याकांडाचे नेमके कारण कळत नव्हते. हसनैन वरेकर आपल्या मतीमंद बहिणीसोबत लैंगिक चाळे करायचा अशी माहिती सुबियाने पोलिसांना दिली आहे. सुबियाने हसनैनला रंगेहाथ पकडलं होत आणि हे कुटुंबाला सांगितलं होते. 5 फेब्रुवारीला हसनैनला त्याच्या आईने मारहाणदेखील केली होती. ज्यामुळे हसनैन अस्वस्थ होता. याचा राग त्याच्या मनात होता.
आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये तसंच अंगावरील कर्ज यामुळे कुटुंबाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याअगोदर मिळालेल्या माहितीप्रमाणे हसनैन वरेकरने हत्याकांड करण्याआधी कुटुंबियांना गुंगीचं औषध दिल्याचा पोलिसांना संशय आहे .