नामदेव शास्त्रींना पोलीस संरक्षण देणार?

By admin | Published: January 11, 2015 02:19 AM2015-01-11T02:19:23+5:302015-01-11T02:19:23+5:30

धनंजय मुंडे यांच्याकडून जिवाला धोका असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांना पोलीस संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Police help to Namdev Shastri? | नामदेव शास्त्रींना पोलीस संरक्षण देणार?

नामदेव शास्त्रींना पोलीस संरक्षण देणार?

Next

पोलिसांत तक्रार : धनंजय मुंडेंकडून जिवाला धोका
पाथर्डी (जि. अहमदनगर) : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून जिवाला धोका असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांना पोलीस संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नामदेव शास्त्री यांना दूरध्वनीवरुन धमकी आल्याची फिर्याद गडाचा सेवेकरी भारत खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे़ त्यात महंतांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. महंतांना संरक्षण देण्यासंदर्भात पोलिसांनी न्यायालयाचे मार्गदर्शन मागितले आहे.
खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ५ जानेवारी रोजी दुपारी गडाच्या दूरध्वनीवर, ‘शास्त्री कोठे आहेत? जिवंत आहे का? गाडी रस्त्यावर दिसली की गाडीवर दगडफेक करू’, असा एक निनावी फोन आला. त्यानंतर फोन बंद झाला.
त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरुन फोन आला़ फोन करणाऱ्यास नाव विचारले असता, त्याने सुरेश मुंडे असे नाव सांगितले़
‘उद्या गडावर कोणाचीही गाडी येऊ द्यायची नाही़ येऊ दिली तर पुढे परिणाम पहा’, अशी धमकी देत फोन बंद केला़
त्याचदिवशी रात्री महंतांना त्यांच्या मोबाईलवर फोन करुन, ‘आम्ही बीड जिल्ह्यातील आहोत़ तुम्ही आमच्या नेत्यावर दगडफेक करायला लावली़ आम्ही पाहून घेऊ’, अशी धमकी देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Police help to Namdev Shastri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.