पोलीस शिपाई हेच खरे हीरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 03:21 AM2017-01-20T03:21:54+5:302017-01-20T03:21:54+5:30
पोलीस दलाचे खरे हीरो असल्याचे प्रतिपादन रायगडचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी केले आहे.
अलिबाग : पोलीस शिपाई व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हेच पोलीस दलाचे खरे हीरो असल्याचे प्रतिपादन रायगडचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी केले आहे. हक यांची बदली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी झाल्याने त्यांना रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने निरोप देण्याकरिता जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.
रायगडचे नूतन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी रायगड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेले नावीन्यपूर्ण काम यापुढेही तशाच पद्धतीने चालू ठेवण्यात येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. प्रारंभी पारसकर यांनी हक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले, तर रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच असलेल्या कुलाबा किल्ल्याची प्रतिमा हक यांना रायगडची आठवण म्हणून देण्यात आली.
या निरोप समारंभात अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहा.पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहा पोलीस निरीक्षक आर. एन. राजे, म्हसळा पोलीस ठाण्यातील पोलीस ए. एस. कदम यांनी आपल्या मनोगतात पोलीस अधीक्षक हक यांच्या कार्यकाळातील आपल्या आठवणी सांगून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आलेले अनुभव विषद के ले. कार्यक्र माचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले तर पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांनी आभारप्रदर्शन केले. निरोप समारंभाच्या वेळी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.