राज्यात ३४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, ३१ जणांना मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:15 AM2024-07-01T02:15:26+5:302024-07-01T02:17:28+5:30

कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षकाच्या यादीत एकूण २५९ जणांची नावे आहेत. तर बदलीसाठी विनंती केलेल्यांच्या यादीत, एकूण १२० पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. 

police inspectors transferred in the state, some have been extended | राज्यात ३४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, ३१ जणांना मुदतवाढ

प्रतिकात्मक फोटो...

मुंबई - राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काहींना मुदतवाढ देण्यात आली आहे. यात विभागातील कालावधी पूर्ण झालेल्या आणि विहित कालावधी पूर्ण न झालेल्या, मात्र विनंती केलेल्या, अशा एकूण ३४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर ३१ जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी रविवारी काढला. 

कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षकाच्या यादीत एकूण २५९ जणांची नावे आहेत. तर बदलीसाठी विनंती केलेल्यांच्या यादीत, एकूण १२० पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. 

यात, श्रीकांत चंद्रकांत कंकाळ अ.ज.प्र.त.सं. छत्रपती संभाजीनगर येथून पुणे ग्रामिणमध्ये बदली करण्यात आली आहे. अर्जून रामकृष्ण रजाने यांची मुंबई शहरातून नवीमुंबईमध्ये बदली करण्यात आली आहे, संदिप पोपट रणदिवे यांची जळगाव येथून मुंबई शहरासाठी बदली करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, बदलीनंतर बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेशही पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.

Web Title: police inspectors transferred in the state, some have been extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.