मावळातील जमिनीच्या मॅटरमध्ये पोलिसांना इंटरेस्ट

By Admin | Published: May 4, 2017 02:45 AM2017-05-04T02:45:32+5:302017-05-04T02:45:32+5:30

मुंबई व पुणे या शहरांसाठी मध्यवर्ती असा हा मावळ परिसर आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने मोठ्या प्रमाणवर

Police interference in Mawal matter | मावळातील जमिनीच्या मॅटरमध्ये पोलिसांना इंटरेस्ट

मावळातील जमिनीच्या मॅटरमध्ये पोलिसांना इंटरेस्ट

googlenewsNext

लोणावळा : मुंबई व पुणे या शहरांसाठी मध्यवर्ती असा हा मावळ परिसर आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने मोठ्या प्रमाणवर जमिन खरेदी विक़्रीचे व्यवहार या परिसरात होत आहेत. बक्कळ कमाईच्या अशा व्यवहारांमुळे खून, दरोडे, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या तपासाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते.
जमिनीला भाव आल्याने मावळ तालुका हा सोन्याचा तुकडा म्हणून ओळखला जातो. सर्वच सुखसोयींनी समृद्ध असलेल्या मावळावर अनेक धनिकांच्या नजरा आहेत. जमिनीच्या व्यवहारातून कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातूनच गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, मावळातील पोलीस यंत्रणेला गुन्हे रोखणे आणि त्याचा उलघडा करण्यापेक्षा जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे.
एरवी सर्वसामान्य शेतकरी जागा जमिनींच्या वादाची प्रकरणे घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यास हा सिव्हिल मॅटर आहे. तुम्ही महसूल
विभागात जा, कोर्टात जा असा सल्ला देणारे काही भांडवलदार धार्जिण पोलीस धनिकांची तक्रार येताच तातडीने दखल घेत आहे. वेळप्रसंगी जागा मालक व शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली जाते.
धनिकांना स्थानिक गावगुंडांची व गुुन्हेगारांची साथ मिळत आहे. जमीन फसवणुकीचे प्रकार दाबण्यासाठी व दबाव टाकण्यासाठी पोलिसांचा आसरा मिळतो. यातून हात चांगलेच ओले होतात. त्यामुळे काही अधिकाऱ्यांची सिव्हिल केसमध्ये आवड वाढलीय. (वार्ताहर)


पोलिसांकडून एकाही गुन्ह्याचा नाही छडा

लोणावळ्यातील महाविद्यालयीन युवक-युवतीच्या खूनाला एक महिना उलटला तरी, अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हातील लागलेले नाहीत. तसेच धामणे येथील दरोड्यात आई-वडिलांसह मुलाची हत्या करण्यात आली होती. या तपासात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असले तरी अद्याप आरोपींचा छडा लागलेला नाही.
त्याचप्रमाणे सांगवडेतील महिला सरपंचाच्या पतीची निर्घृन हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात दिरंगाईमुळे या हत्येचे सूत्रधार देखील अद्याप मोकाट आहे.

आर्थिक पोत सुधारतो

खरे तर मावळ तालुक्यात येण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांना वरिष्ठांकडे बोली लावावी लागते, असे सर्रास बोलले जाते. मात्र, पोलिसांची कार्यपद्धती पाहिल्यास त्यात तथ्य असल्याचे जाणवते. मावळात किंवा लोणावळा परिसरात पोलीस येण्यापूर्वीची त्याची आर्थिक परिस्थिती काय होती. वर्ष दोन वर्षे झाल्यानंतर त्याच्या रहाणीमानात कसा बदल होतो, आर्थिकदृष्टया अधिकारी कसे सुधारतात हे बदल सर्वसामान्यांना दिसतो.

Web Title: Police interference in Mawal matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.